मुंबई-पुणे जुने हायवे रस्त्यावरील दाडफाटयाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर इसमाचे अंदाजे वय ३५ वर्षे असून वर्ण सावळा, उंची ५.५ फुट, केस काळे, दाढी वाढलेली, बांधा मजबुत, नाक सरळ, अंगात पांढरा शर्ट पॅन्ट, डावे हाताचे पोटरीवर जुन्या उभ्या व आडव्या जखमा, उजव्या दंडावरती तोळ, कपाळावर मधोमध तीळ, उजव्या डोळयाचे भुवईचे बाजूस दोन इंद्याचा जुना वन, डावे काखेचे खाली दोन तीळ असा पेहराव आहे.
सदर इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोना प्रदिप पोपेटे यांच्याशी संपर्क साधावा.