पनवेलमध्ये झोपेत ब्रिजच्या पिल्लरच्या कठड्यावरून पडुन एक इसम जखमी झालेल्या अवस्थेत पनवेल शहर पोलिसांना मिळून आल्याने त्यास अॅम्बुलन्सने उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाल्याचे घोषीत केले असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत .
अनोळखी बेवारस इसम वय अंदाजे वय 35 ते 40 वर्ष, रंग गोरा, उंची अंदाजे 5 फुट 5 इंच, चेहरा उमट अंगाने मध्यम, डोक्याचे केस काळे, दाढी मिशीचे केस काळे वाढलेले, अंगात नेसुन फुलाची बारीक डिझाईन असलेला हाफबाहयाचा शर्ट व काळसर रंगाची फुल पॅन्ट अशा वर्णनाचा आहे .
या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस किंवा पोलीस उपनिरीक्षक राहुल डोळस यांच्याशी संपर्क साधावा .