जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां ह.भ.प.श्रीमती विजया विश्रामराव कदम यांचं निधन

चौक | अर्जुन कदम
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,वारकरी संप्रदाय च्या निस्सीमभक्त,दानशूर श्रीमती ह.भ.प.विजया विश्रामराव कदम यांच्या निधनाने कोयनावेळे या परिसरात दुःखाची छाया पसरली आहे.
भारतीय लष्करात अत्यंत निष्ठेने देशसेवा करणारे व युद्धात भाग घेतलेले वैकुंठवासी विश्रामराव कदम यांच्या श्रीमती विजया कदम या धर्मपत्नी होय. लष्करात असलेल्या पतीच्या मागे आपल्या कुटुंबाची व कोयना धरणग्रस्त यांच्या पाठीशी त्या खंबीर पणे उभ्या होत्या. विस्थापित झालेल्या कोयना धरणग्रस्त यांच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.दानशूर व्यक्ती म्हणून त्या परिचित होत्या. मुलीनी शिक्षित व्हावे असा ध्यास त्यांनी घेतला होता.आपल्या हयातीत त्यांनी मोठा मुलगा अणि कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्यावरही कुटुंबाला आधार दिला.आपल्या परिसरात वारकरी संप्रदायची पताका त्यांनी उंचावली.आळंदी,पंढरपूर वारी करणे हा त्यांचा क्रम होता,अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.त्यांच्या पश्चात मुलगा विनेश व नातू चेतन असून त्यांचे अंतिम धार्मिक विधी सोमवारी ७ डिसेंबर २०२६ रोजी कोयनावेळे(घोट कॅम्प) येथे होणार आहेत.