चोरीच्या घटनेने पेण पुन्हा हादरले; शाळांमध्ये चोरीमुळे नागरिकांमध्ये भीती, रोख रक्कम व साहित्य लंपास

पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूलचा ९७.२९% निकाल – यशस्वी विद्यार्थ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन!
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण नगरपालिकेच्या इमारतीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामासाठी आणलेल्या धातूची चोरी उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पेण शहरात पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे. पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल आणि सौ. म. ना. नेने कन्या विद्यालयात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी पोलिस गस्तीचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी पेणवासीयांकडून होत आहे.
दि. २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी प्रायव्हेट हायस्कूल, पेण येथे प्रवेश करून कार्यालयातील कपाटे फोडली व सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. या शाळेतून रोख रक्कम रुपये १२,१७३/- चोरीस गेली असून इतर कोणतीही वस्तू चोरीस गेल्याचे आढळले नसले तरी कार्यालयातील साहित्य मात्र अस्ताव्यस्त करण्यात आले आहे.
यानंतर चोरट्यांनी सौ. म.ना. नेने कन्या विद्यालयात प्रवेश करून कार्यालयातील कपाटे व मुख्याध्यापकांच्या केबिनमधील कपाटे फोडली. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त करून रुपये १७,८४५ रोख रक्कम चोरून नेण्यात आली. तसेच सुमारे ५० मीटर लांबीची साउंड सिस्टीमची वायर बंडलही चोरीस गेली आहे. दोन्ही शाळांमधून मिळून एकूण रुपये ३०,०१८ रोख रक्कम चोरीला गेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पेण पोलीस करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपींना  लवकरात लवकर  जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
उन्हाळी सुट्टीत MS-CIT करण्यासाठी पेण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल कम्प्युटर एक उत्तम पर्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *