महाड एसटी आगाराचा कारभार ढासळला; जुन्या बसेसमुळे प्रवासी त्रस्त!

महाड | प्रतिनिधी 
कोकणातील रायगड सह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांचे मध्यवर्ती आगार म्हणून ओळखले जाणाऱ्या महाड एसटी आगाराचा कारभार दिवसेंदिवस खालावत चालला असून तब्बल २४५ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे व कालबाह्य जुन्या एसटी बसेस मुळे एसटी आगाराचा कारभार दिवसेंदिवस खालावत चालला असून जाणीवपूर्वक महाड एसटी आगाराकडे दुर्लक्ष करून खाजगी वाहतुकीला महाड एसटी आगार बहाल केल्याची चर्चा प्रवासी वर्गाकडून ऐकण्यास मिळत असून परिणामी प्रवासी वर्ग त्रस्त झाला असून महामंडळाचे अधिकारी वर्गासह लोकप्रतिनिधी देखील सुस्त झाल्याचे चित्र महाड एसटी आगारात पाहण्यास मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती आगार म्हणून महाड एसटी आगाराकडे पूर्वीपासून पाहिले जात होते मात्र मागील पाच वर्षापासून महाड एसटी आगाराचा कारभार ‘आंधळं दळते आणि कुत्र पीठ खाते ‘असा वरिष्ठांच्या आदेशामुळे झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे महाड एसटी आगारातील जुन्या व कालबाह्य झालेल्या एसटी बसेस वारंवार रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर दररोज घडत आहे त्याचबरोबर एसटी आगारातील चालक वाहकासहित तब्बल २४५ पदे रिक्त आहेत ही रिक्त पदे भरण्याचे नाव एसटी महामंडळ घेत नाही.
तसेच सन २०२१ नंतर महाड एसटी आगारातून चालक वाहकांसहित लिपिक हे त्या त्या जिल्ह्यात बदलून गेलेल्यांची संख्या किमान ५० च्या वर आहे मात्र त्या बदल्यात नवीन कर्मचारी महाडा आगारात देण्याचे जाणीवपूर्वक एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केल्याने महाड एसटी आगाराचा कारभार अपुरा कर्मचाऱ्यांमुळे दिवसेंदिवस ढासळत चालला आहे.
महाड एसटी आगारात एकूण किती कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे याबाबतची माहिती पुढील प्रमाणे:
१) आगार व्यवस्थापक कनिष्ठ १ पद रिक्त
२) सहाय्यक वाहतूक अधीक्षक १ पद रिक्त
३) वाहतूक निरीक्षक १ पद रिक्त
४) वाहतूक नियंत्रक ४ पदे रिक्त
५) चालक ८५ पदे रिक्त
६) वाहक ९५ पदे रिक्त
७) वरिष्ठ लिपिक २ दोन पदे रिक्त
८) लिपिक टंकलेखक ४ पदे रिक्त
९) लिपिक टंकलेखक (माहिती व तंत्रज्ञान) १ पद रिक्त
१०) शिपाई १ पद रिक्त
११) सुरक्षा रक्षक ३ पदे रिक्त
१२) सफाई गार ५ पदे रिक्त
१३) सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक १ पद रिक्त
१४) कारागीर क वर्ग१० पदे रिक्त
१३) सहाय्यक कारागीर १३ पदे रिक्त
१४) सहाय्यक १० पदे रिक्त
१५) स्वच्छ क ४ पदे रिक्त
अशी तब्बल २४५ पदे महाड एसटी आगारात रिक्त असल्याने एसटी आगाराचा कारभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर कसा चालवायचा असा प्रश्न आगार प्रमुखांसह आगारातील कर्मचाऱ्यांना पडला आहे परिणामी अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्यामुळे कामाचा वाढता तणाव कर्मचाऱ्यांवर येत असल्याने व त्यात जुन्या कालबाह्य झालेल्या बसेसमुळे चालक वाहक कर्मचारी वर्ग देखील त्रस्त झाला आहे मात्र याचे सोयर सुतक एसटी महामंडळाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना पडलेले नसल्याने महाड एसटी आगाराचा कारभार दिवसेंदिवस ढवळत असल्याने अशा कारभारावर प्रवाशांकडून वारंवार आगारप्रमुखांसह एसटी कर्मचाऱ्यांना बोलणे खावी लागत आहेत
महाडचे विद्यमान आमदार व तथा राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना देखील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार महाड आगारातील जुन्या कालबाह्य झालेल्या एसटी बसेस बाबत व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे चालक व वाहक यांना दुबार ड्युटी करण्यास भाग पाडत असल्याने कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत असल्याने कर्मचारी हातबल झाले आहेत यासाठी मंत्री या नात्याने आपण महाड एसटी आगारात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांनी वारंवार तोंडी तोंडी सांगितलेले आहे तसेच लेखी निवेदन देखील देण्यात आलेले आहे मात्र या निवेदनाला सत्ताधारी मंत्र्यांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने महाड एसटी आगार हे कोकणातील मध्यवर्ती आगार असून देखील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एसटी आगार अल्पावधीत बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही
शिवशाही बसेस ऐवजी इलेक्ट्रिक बसेस द्याव्यात!
महाड एसटी आगारातून महाड बोरिवली, महाड मुंबई ,महाड पुणे, या मार्गावर शिवशाही बसेस चालवल्या जातात सद्यस्थितीत महाड आगारात ८ शिवशाही बसेस आहेत मात्र या बसेस जुन्या व कालबाह्य झाल्या असून या बसेस मधील वातानुकूलित यंत्रणा वारंवार रस्त्यामध्ये बंद पडत असून अनेक बसेस रस्त्यामध्ये बंद पडण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने शिवशाही बसेस मधून प्रवास करणारा प्रवासी वर्ग या जुन्या एसटी बसेस मुळे हतबल झाले असून या एसटी बसेस बंद करून त्या ऐवजी महाड एसटी आगाराला किमान १५ इलेक्ट्रिक बसेस आवश्यक आहेत या एसटी महामंडळाने तातडीने महाड आगाराला देऊन शिवशाहीतून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला सुखकारक प्रवास देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मात्र महाड एसटी आगाराला सद्यस्थितीत कोणी वाली उरला नसल्याचे चित्र या एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे व कालबाह्य झालेल्या जुन्या एसटी बसेसच्या परिस्थितीवरून सध्या पाहण्यास मिळत आहे