कर्जत हादरला : महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ९ वर्षाय मुलाचा मृत्यू !

कर्जत हादरला : महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ९ वर्षाय मुलाचा मृत्यू !
कर्जत (गणेश पवार) : 
कर्जत तालुक्यात पडणाऱ्या अतिवृष्टी दरम्यान कर्जत महावितर विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दिर व भावजय यांचा महावितरणच्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू व एक महिला जखमी झाल्याची घटना ताजी असताना, पुन्हा एका लहान मुलाच्या अंगावर विद्युत तार पडून मृत्यूची घटना घडली आहे.
कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील साळोख वाडी येथील राहाणार आदिवासी रामचंद्र गोटीराम वाघमारे, व पार्वती रामचंद्र वाघमारे यांना विजेचा शॉक लागून मृत्यू तर सुनिता गोपाळ वाघमारे ही महिला जखमी झाल्याची घटना ताजी असताना, पुन्हा एकदा कर्जत तालुका ‘ हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना ही शनिवारी दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी घडली आहे. नरसापुर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावात महावितरणच्या मेन विद्युत लाईन ही एका शाळेतील लहान मुलाच्या अंगावर पडून त्याला शॉक लागून त्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर मुलाला तातडीने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. या लहान मुलाच्या मृत्युचे घटनेने संपूर्ण सालवड गावावर तसेच भोसले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर मृत झालेल्या मुलाचे नाव हे शिव रूपेश भोसले असुन, तो अवध्या ९ वर्षाचा आहे. त्याच्या कुटुंबात आई-वडिलांनी एक मोठा भाऊ असा परिवार आहे. तर महावितरणच्या या डिसाळ कारभारावर व सदर घटना ही दुपारी घडून देखील घटना स्थळी महावितरणाचा एक ही अधिकारी पोहचला नसल्याने, व या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणा पाहाता तसेच एका लहान मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याचे घटनेमुळे मुलाचे नातेवाईक व ग्रामस्थांचा प्रचंड संताप वाढला महावितरणच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करत संतप्त ग्रामस्थांनी शिव रूपेश भोसले याचा मृतदेह घेऊन कळंबोली सबस्टेशन नेत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारत आणि निषेध व्यक्त केला आहे.
महावितरणच्या या अपघाती तारांमुळे याआधी सुद्धा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार कधी सुधारणार की आणखी लोकांची जीव जाण्या पर्यंत हे अधिकारी निर्लज्जपणे वागणार का? असा संतप्त सवाल कर्जत तालुक्यातून उपस्थित केला जात असुन, संतप्त ग्रामस्थ, नातेवाईक व कुटुंबातील लोकांकडून महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्याची मागणी ही केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *