कर्जत तालुका हा बहू-आदिवासी वस्ती असलेला भाग असून येथे आदिवासी समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत आहे. या पार्श्वभूमीवर मोरेवाडी गावातील भूमीपुत्र, स्व. अनंता केवारी यांचे चिरंजीव डॉ. विशाल केवारी यांनी प्रेरणादायक वाटचाल करत एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली आहे.
डॉ. विशाल यांनी प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत अत्यंत मेहनतीने व चिकाटीने शिक्षण पूर्ण केले असून, आता कर्जत तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, कळंब येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून ते रुजू झाले आहेत. त्यांचा प्रवास हा अनेक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.
त्यांच्या या यशामुळे कुटुंब, समाज व तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेतर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, महिला अध्यक्षा तथा मा.उपसभापती जयवंती ताई हिंदोळा, महाराष्ट्र राज्य संघटना उपाध्यक्ष दादा पादिर कर्जत तालुका समाज संघटना उपाध्यक्ष मंगळ केवारी, सचिव भगवान भगत, खजिनदार अर्जुन केवारी, माजी पेण प्रकल्प नियोजन समिती माजी अध्यक्ष दत्तात्रेय सुपे,राजू झुगरे, दत्तात्रेय हिंदोळा,मनोहर दरवडा, प्रकाश केवारी, च चाहू सराई,कांता पादीर,कमळू थोराड, बबन शेंडे, सुरेश दरवडा, सुरेश केवारी, भाऊ मेंगाळ,बाळा भला लक्ष्मण दरवडा तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.