उरण फाटा व कळंबोलीत तृतीयपंथीयांवर पोलिसांची कारवाई

Third jender
पनवेल | संजय कदम
नवी मुंबई गुन्हे शाखेने उरण फाटा सर्व्हिस रोड आणि कळंबोली स्टील मार्केट परिसरात विशेष कारवाई करत एकूण १० तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले आहे. रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना टाळ्या वाजवून हातवारे करणे, बिभत्स हावभाव व अश्लील चाळे करत सार्वजनिक शिस्त भंग केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दोन वेगवेगळ्या टिम तयार करून कारवाई केली. त्यात उरण फाटा येथे ५ आणि कळंबोली स्टील मार्केट परिसरातून ५ तृतीयपंथीयांना ताब्यात घेऊन सीबीडी तसेच कळंबोली पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई सह पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात वपोनिरी पृथ्वीराज घोरपडे, सपोनि राजश्री शिंदे, पोउपनिरी सरिता गुडे, पोशि ठाकुर, पोशि चव्हाण, पोशि पारासुर, मपोना अडकमोल, मपोना भोये व चालक पोहवा हांडे यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *