उद्या आझाद मैदानावर कुणबी समाजाचा एल्गार : OBC आरक्षण अबाधित ठेवण्याची मागणी

Roha kunabi samaj
कोलाड (श्याम लोखंडे) :
जन्माने आणि कर्माने कुणबी असलेल्या समाजाने OBC आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे जनाक्रोष आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतील कुणबी समाजाचे हजारो बांधव सहभागी होणार आहेत.
कुणबी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगने व उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राबवले जात आहे. सरकारने मराठा समाजाला OBC मध्ये समाविष्ट करताच, कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर दिलेल्या निर्णयाचा विरोध करत सरसकट GR रद्द करण्याची मागणी केली आहे.
अधिकार्‍यांनी हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना तहसीलदारांच्या माध्यमातून दिले असून, आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचे मार्गदर्शन देखील देण्यात आले आहे.
कुणबी समाजाचे बांधव हा मोर्चा “ना भूतो ना भविष्य” असा नारा देत सरकारच्या अन्यायाविरुद्ध आपले हक्क सिद्ध करण्यासाठी सहभागी होणार आहेत.
——————————–
कुणबी समाजाच्या वतीने उद्याचा मोर्चा “भूतो ना भविष्य” हा नारा घेऊन आझाद मैदानावर काढला जाणार आहे. या आंदोलनामागील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
  1. मराठा समाजाला शासनाने दिलेले OBC आरक्षण रद्द करावे.
  2. घटना बाहा न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी.
  3. OBC विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती मिळावी.
  4. जातिनिहाय जनगणना करावी.
  5. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा व १५० कोटी रुपये आर्थिक तरतूद.
  6. लोकनेते शामराव पेजे न्यासासाठी ५० कोटी निधी देणे.
  7. पेजे व म्हसकर समितीच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात.
  8. कोकणातील कुणबींच्या खोत जमिनीवरील नोंदी कराव्यात.
  9. जन्माने व कर्माने कुणबी असूनही आर्थिक मागास स्थितीत असलेल्या समाजाला जात दाखला मिळवून शिक्षणातील नुकसान टाळावे.
  सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा आझाद मैदानावर काढण्यात आले असल्याचे संघ अध्यक्ष अनिल नवगने आणि उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *