अलिबाग–रेवस मार्गावर भीषण अपघात; १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Alibag revas road accident
रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील अलिबाग–रेवस राज्य मार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षांच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिच्यासोबत प्रवास करणारे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कनकेश्वर फाटा ते चोंढी दरम्यान लायन्स हॉस्पिटलजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. हेमंत गजानन कोळी (वय ४०) हे आपल्या होंडा डिओ १२५ स्कुटीवरून कुटुंबासह रेवसच्या दिशेने जात होते. त्यांच्या सोबत पत्नी लता (३८), मुलगी हेतल (१३) आणि लहान मुलगी क्रीती (५) असे चौघे प्रवास करत होते. सर्वजण कुलाबा, मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, समोरून येणाऱ्या एका अज्ञात रिक्षाचालकाने अचानक हुलकावणी दिल्याने हेमंत कोळी यांचा स्कुटीवरील ताबा सुटला. नियंत्रण सुटलेली स्कुटी थेट समोरून येणाऱ्या पीएनपी कंपनीच्या खासगी बसला धडकली. अपघात इतका भीषण होता की स्कुटीचा चक्काचूर झाला आणि प्रवासी रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात हेतल कोळी हिचा जागीच मृत्यू झाला, तर हेमंत कोळी, लता कोळी आणि क्रीती कोळी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *