नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा पुढाकार! दांडिया रास कार्यक्रमात बक्षिसांची लयलूट; पर्यटकांची हजेरी

माथेरान | मुकुंद रांजाणे 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या विजयादशमी सणाच्या पार्श्वभूमीवर नऊ दिवस दांडिया रास कार्यक्रमात युवा वर्गासह आबालवृद्ध मंडळींनी मोठया उत्साहात आणि आनंदाने  आपला सहभाग नोंदवला. माथेरान मधील विविध ठिकाणी  दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करून सलग नऊ दिवस गरबा खेळण्यात आला. येथील श्रीराम चौकात स्वर्गीय माजी नगराध्यक्ष कुमार भाई चौधरी यांच्या स्मरणार्थ यावर्षी पहिल्यांदाच विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने दांडिया रास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी तरुणाईसह आबालवृद्ध नागरिक आणि विशेष म्हणजे पर्यटकांनी सुध्दा उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता त्यामुळे गरबा नृत्याला एक वेगळाच आनंद प्राप्त झाला. सलग नऊ दिवस कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या गरबा रसिकांसाठी उत्कृष्ट खेळ करणाऱ्यासाठी बक्षिसाची लयलूट करण्यात आली. त्यामुळे श्रीराम चौकात मोठया प्रमाणात गरबा प्रेमींची गर्दी पहावयास मिळाली. पैठणी साड्या, टीव्ही संच, स्मार्ट फोन, सायकल,व्हॅलेट तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या सर्व आकर्षक बक्षिसांची लयलूट विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आली. या कार्यक्रमासाठी निखिल शिंदे, अनिकेत जाधव, चंद्रकांत जाधव, अमोल चौगुले यांसह नवतरुण नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.