महाड तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनेत. मागील काही दिवसापासून सातत्याने वाढ झाली असून महिला आणि लहान मुली या अत्याचाराला बळी पडत आहेत…काल महाड तालुक्यातील एका विभागात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महाड तालुक्यातील एका वाडीमध्ये हा नराधम सुतारकाम करण्यासाठी गेला होता. त्याने मुलीची आई काम करण्यासाठी बाहेर गेली आहे व तिचे वडील भोर या ठिकाणी गेले आहेत असे पाहिले आणि मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या नराधमाने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ही घटना कोणाला सांगितलीस तर जीवे ठार मारू अशी धमकी सुद्धा या नराधमाने त्या अल्पवयींन मुलीस दिली.
या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी चे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस के मुंढे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत.
सदर अल्पवयीन मुलीची आरोग्य तपासणी फॉरेन्सिक टीमने करून त्या नुसार महाड एमआयडीसी पोलिस स्टेशनने भारतीय न्याय संहिता कलम ३३२(ख) ३३२(क)३५१(३) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१० नुसार गुन्हा दाखल झाला आहे ..
सदरील बलात्कारी आरोपी सचिन पांडुरंग सुतार या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..आरोपी हा राहणार कुंभारकोंड वरंध तालुका महाड, जिल्हा रायगड येथील रहिवासी आहे.