तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी जोर धरत असून भाजपचे आ.प्रवीण दरेकर यांच्या शनिवारी प्रचार सभांना गदारोळ उठविला असताना मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत कापडे जि.प.गटाचे उमेदवार डॉ.निलेश कुंभार आणि लोहारे जि.प.गटाचे उमेदवार चंद्रकांत कळंबे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या सभांचे आयोजन सोमवारी करण्यात आले असल्याची माहिती संपर्ककार्यालयातून देण्यात आली.
कापडे जि.प.गटाचे उमेदवार डॉ.निलेश कुंभार, कापडे बुद्रुक पं.स. गणातील उमेदवार अनिल दळवी, माटवण पं.स.गणातील शेकाप उमेदवार साक्षी कांबळेकर यांच्या प्रचारासाठी सोमवार, दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जाहिर सभा होणार आहे. लोहारे जि.प.गटाचे उमेदवार चंद्रकांत कळंबे, कोतवाल बुद्रुक पं.स. गणाचे उमेदवार अविनाश शिंदे आणि लोहारे पं.स. गणाच्या उमेदवार अनिता भिलारे यांच्या प्रचारासाठी दुपारी 1 वाजता मंत्री गोगावले यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेत
मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी वाकण पितळवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे काशिनाथ कुंभार, शैलेश सलागरे, भरत चोरगे, संजय मोदी, खेडेकरबुवा, विठ्ठल साने, तात्याबा साने यांच्या उपस्थित होते. वाकण पितळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ तूडील कर, ज्ञानदेव तूडीलकर, भरत मनोहर तुडिलकर रमेश तुडिलकर, शाम वरणकर, संदीप वरणकर, शैलेश देवे, वैभव कुंभार, सनी कुंभार, जितेंद्र तुडिलकर, अक्षय कुंभारकर, शरद तुडिलकर, सुनील कुंभार यांचा प्रवेशकर्त्यांमध्ये समावेश आहे.
जिल्हा परिषद निवडणुक मतदानाला काही दिवस उरले असतानाच पितळवाडी विभागातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्री ना.गोगावले यांनी सर्वांचे भगवी पताका घालून स्वागत केले.