महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री Nitesh Rane यांच्या हस्ते आणि खासदार Sunil Tatkare यांच्या अध्यक्षतेखाली Bharadkhol येथे १३७.२२ कोटी रुपयांच्या मत्स्यबंदर विकासकामाचे भूमीपूजन उत्साहात पार पडले. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सागरमाला विकास योजनेअंतर्गत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जाणार असून त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील मत्स्यव्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्यव्यवसाय खात्याच्या निधीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले. “भरडखोल येथे उभारण्यात येणारे बंदर दर्जेदार असेल. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करून बंदराचे लोकार्पण करण्यात येईल. त्यामुळे मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी निश्चित होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात डिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बोटींचा वापर वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी कोकण किनारपट्टीच्या पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय विकासावर भर देताना दिवेआगर येथे अत्याधुनिक मस्त्यालय व पर्यटन सुविधा उभारण्याची मागणी केली. भरडखोल आणि श्रीवर्धन परिसरात उभारल्या जाणाऱ्या जेट्टीमुळे मच्छिमारांना स्थानिक लिलाव केंद्र उपलब्ध होईल आणि मुंबईतील ससून डॉकवरील अवलंबित्व कमी होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीवर्धन सभापती सुचिन किर, जिल्हा परिषद सदस्या वासंती गुणाजी, म्हसळा सभापती बबन मनवे, पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर, भरडखोल सरपंच ज्योती काळपाटील तसेच मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.