पहलगाम हल्ल्यानंतर मोठा निर्णय: काश्मीरमधील 50 पर्यटन स्थळांना सुरक्षा कारणास्तव तात्पुरती बंदी

Indian army
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पहल्गाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने महत्त्वाचा पाऊल उचललं आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा विचार करत काश्मीरमधील सुमारे 50 पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
हल्ल्यात सहभागी दहशतवादी अद्याप फरार असून, सुरक्षा दलांचा शोध मोहीम सुरू आहे. त्याचवेळी, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांवर कारवाई करत, अनेकांना सैन्याकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
📍 कोणती पर्यटन स्थळं बंद करण्यात आली?
🔹 बांदीपोरा: गुरेज घाटी (बाह्य पर्यटकांसाठी बंद)
🔹 बडगाम: यूसमार्ग, तौसीमैदान, दूधपथरी
🔹 कुलगाम: अहरबल, कौसरनाग
🔹 कुपवाडा: बंगस, हंदवाड़ा, चंडीगाम, वुलर/वाटलॅब
🔹 अनंतनाग: सूर्य मंदिर खीरीबल, वेरीनाग गार्डन, सिंथन टॉप
🔹 बारामुला: हब्बा खातून पॉईंट, नामब्लान झरना, इको पार्क
🔹 पुलवामा: संगरवानी
🔹 श्रीनगर: जामिया मशिद, बादामवारी, दाचीगाम ट्राउट फार्म, फकीर गुजरीतील रिसॉर्ट्स
🔹 गांदरबल: नारानाग, हंग पार्क
🛑 दक्षिण काश्मीरमधील अनेक मुघल गार्डनही सध्या पर्यटकांसाठी बंद आहेत.
सुरक्षेचा आढावा सातत्याने घेतला जात असून, आणखी काही ठिकाणांचा समावेश या यादीत होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
🗣️ अद्याप कोणताही औपचारिक आदेश जाहीर न झाल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु प्रशासनानं याठिकाणी प्रवेश बंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *