अलिबागमध्ये बनावट चलन रॅकेट उघडकीस; लाखोंच्या नोटांसह एक जण अटकेत

Alibag nota japg
अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलिसांनी नुकत्याच मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच अलिबाग शहरातील बाजारपेठेतूनही लाखो रुपयांच्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
मयेकर वाडी येथे राहणाऱ्या भुषण विजय पतंगे (वय-३५ वर्षे, व्यवसाय-खाजगी नोकरी, रुम नं. ८४८, मयेकर लाईन, अलिबाग) याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत अलिबाग पोलिसांना मिळाली.
यावरून पोलिस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी पोलिस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे, दिपक मोरे, हवालदार विलास आंबेतकर, शिपाई अनिकेत धिवरे, सुनील जाधव, अनिकेत म्हात्रे यांच्या पथकासह ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास छापा टाकला.
कारवाई दरम्यान भुषण पतंगे यांच्या ताब्यातून बनावट नोटा व बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १७७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७८, १७९, १८०, १८१ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक मोरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *