WhatsApp वर येणार नवं कॉन्टॅक्ट मॅनेजर फीचर; युजर्सचा अनुभव होणार आणखी उत्कृष्ट

Whatsaap
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
WhatsApp हे जगभरातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे आणि युजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म नेहमीच नवनवीन फीचर्स सादर करत असतं. आता WhatsApp लवकरच युजर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त सुविधा घेऊन येत आहे – कॉन्टॅक्ट मॅनेजर फीचर.
या नव्या फीचरच्या मदतीने युजर्स अगदी सहजपणे आपले कॉन्टॅक्ट्स मॅनेज करू शकतील, ज्यामुळे त्यांचा चॅटिंग अनुभव अधिक सुधारेल. विशेष म्हणजे, हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला मोबाईलची गरज नाही, कारण तुम्ही कोणत्याही डिव्हाईसवरून कॉन्टॅक्ट्स मॅनेज करू शकणार आहात.
डेस्कटॉप आणि लिंक केलेल्या डिव्हाईसवरही कॉन्टॅक्ट्स सेव्ह करा
Meta ने सांगितले आहे की, सुरुवातीला हे फीचर WhatsApp वेब आणि विंडोज प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध होईल. युजर्स आता डेस्कटॉप किंवा इतर लिंक केलेल्या डिव्हाईसच्या मदतीने कॉन्टॅक्ट्स सहजपणे सेव्ह करू शकतील. WABetaInfo या WhatsApp फीचर्स ट्रॅक करणाऱ्या वेबसाइटने या अपकमिंग फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.
कॉन्टॅक्ट्स मॅनेजमेंट होणार सुलभ
यापूर्वी अनेक युजर्सना फोन कॉन्टॅक्ट्स आणि WhatsApp कॉन्टॅक्ट्स मॅनेज करताना अडचणी येत होत्या. फोनबुकमधून नंबर डिलीट केल्यानंतर तो नंबर WhatsApp वरूनही गायब व्हायचा. मात्र, आता WhatsApp मध्ये सेव्ह केलेले कॉन्टॅक्ट्स ऑटोमेटीक दुसऱ्या डिव्हाईसमध्ये देखील मिळू शकतील, त्यामुळे युजर्सना कोणतीही अडचण येणार नाही.
या नव्या फीचरमुळे युजर्सचा WhatsApp वापराचा अनुभव अधिक सुकर आणि आनंददायी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading