10 वी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत पाच हजार पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची पश्चिम रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
.चला तर या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पश्चिम रेल्वे भरतीअंतर्गत एकूण ५०६६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार ५० टक्के गुणांसह १० वी पास असावा, तसेच त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेला असणं गरजेचं आहे. आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.
वयाची अट
खुला प्रवर्ग : १५ ते २४ वर्षे. ओबीसी : ३ वर्षांची सूट. मागासवर्गीय : ५ वर्षांची सूट.
अर्ज फी
खुला/ ओबीसी प्रवर्ग : १०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PWD : कोणतेही शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख :- २३ सप्टेंबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २२ ऑक्टोबर २०२४
असा करा अर्ज
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.