मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांचे २१/३/२०२४ रोजीचे आदेशाचे गटविकास अधिकारी उरण यांनी अवमान केल्याच्या निषेधार्थ तसेच ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा सिमेच्या बाहेर राहणारी परदेशी १० कुटुंबे फक्त २ पाणी देयके (बिल ) भरून महिन्याला १४४० तास पाणी वापरत आहेत. वारेमाप पाणी उपसा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही व्हावी. गेली ४० वर्षाहून जास्त अधिक काळ लोटला तरी जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे.
वर्षानुवर्षे शासन दरबारी शांततेच्या मार्गाने, कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी व जुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी दिनांक १४/४/२०२५ रोजी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सकाळी १० वाजता हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थ उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.
जिल्हाधिकारी रायगड यांनी एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी ८८ व बिगर शेतकरी १६८ अशा एकून २५६ कुटूंबांचे मौजे बोरीपाखाडी उरण येथे १७ हेक्टर जमिनीत ४० वर्षे उलटूनही पुनर्वसन केलेले नाही.त्यामुळे न्याय हक्कासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी या आमरण उपोषणात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना तर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९८६ नुसार एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे मौजे बोरीपाखाडी उरण येथे पुनर्वसन झाल्यानंतर जिल्हाधिकारी रायगड यांनी स्वतःची सही व मोहोर लावून महाराष्ट्र जिल्हा परीषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार पुनर्वसित नविन गाव जिल्हा परीषद रायगड यांच्याकडे हस्तांतर करायचा होता तो त्यांनी हस्तांतर केला नसल्याची कबुली दिनांक १८ ऑक्टोवर २०२३ रोजीच्या पत्राने दिलेली आहे.
दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा परीषद रायगड यांनी शेवा कोळीवाडा गावाचे मौजे बोरीपाखाडी उरण येथे पुनर्वसन झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी पुनर्वसित नविन गाव जिल्हा परीषद रायगड यांच्याकडे हस्तांतर केल्याचा दस्तावेज आढळून आले नसल्याचे व दिनांक ११ मार्च २०२४ रोजीच्या पत्राने ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४ नुसार ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापन केली नसल्याची कबुली दिलेली आहे. मा. ग्रामसेवक ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा यांनी हनुमान कोळीवाडा गावाच्या १७ हेक्टर जमिनीच्या हद्दीचा नकाशा आणि त्या नकाशाप्रमाणे विस्थापित २५६ भुखंड धारकांची यादी व नागरी सुविधेचे स्वतंत्र हनुमान कोळीवाडा गाव नमुना ७/१२, विस्थापित २५६ भुखंड धारकांची यादी नुसार गाव नमुना ७/१२ च्या आकारमाना वरून नमुना नं. ८ असेसमेंट रजिस्टरमध्ये नोंदणीचा दस्तावेज, ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४ नुसार ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा स्थापन केल्याचा दस्तावेज दप्तरी उपलब्ध नसल्याची कबुली दिलेली आहे.
शासनाने शेवा कोळीवाडा गावाचे शासनाच्या मापदंडाने मंजूर असलेले पुनर्वसन न करता आणि कोणताही अधिकृत दस्तावेज नसताना चूकीच्या पध्दतीने १९९२ साली अनधिकृत ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडाची स्थापन करून दिनांक ०१ फेब्रुवारी १९९५ रोजी महसुली गावाची अधिसुचना प्रसिध्द करून गेली ४० वर्षे हनुमान कोळीवाडा गावात शासन निवडणूका घेत असल्याच्या निषेधार्थ एनएसपीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावातील वयोवृध्द व इतर ग्रामस्थ दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी तहसिल कार्यालय उरण येथे आमरण उपोषण करणार आहेत. विस्थापितांच्या हातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास व कोणताही विचित्र प्रकार घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी तहसिलदार उरण यांची राहील असा आक्रमक इशारा हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी दिला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.