
उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
उरण तालुक्यातील धुतुम बैलोंडा खाडीवरील जुना साकव आणि दिघोडे उघडीवरील साकव मोडकळीस आल्याने तेथे नवीन पूल बांधण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आणि सिडको प्रशासनासह इतर विभागांना पत्रव्यवहार करून ही मागणी मांडली. यासोबतच खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी निवेदन देतांना जिल्हा महिला अध्यक्षा तथा माजी महिला व बालकल्याण सभापती उमाताई मुंढे, उरण तालुका अध्यक्षा-कुंदा ठाकूर ,अलिबाग महिला तालुका अध्यक्षा,खालापूर तालुका अध्यक्षा,पूजा विशाल पाटील,जागृती मारुती पाटील, उपस्थित होते.
धुतुमचा साकव निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतोय. दिघोडे आरोग्य केंद्रासाठी नागरिकांना सोयीचा मार्ग उपलब्ध नाही. शिवाय धुतुम येथील आयओटीएल कंपनीमुळे आपत्कालीन सेवा मिळविण्यासाठीही पूल आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी दोन जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पूल बांधण्याची मागणी जनतेतून पुढे आली आहे.
————————————-
धुतुम -बैलोंडा खाडीवर (नांदोरा) व दिघोड़े बेलोरा काप्रीदेव खाडीवरील साकव नादुरुस्त असल्यामुळे सदर जागेवर नवीन दोन पुलाचे बांधकाम करण्याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहारद्वारे विनंती केली होती.सदर पुलांच्या बांधकामाचे हस्तांतर जिल्हा परिषदे कडे करण्यात यावा व सदर कामासाठी लागणारा निधी जिल्हापरिषदेकडे वर्ग करण्यात यावा जेनणेकरून सदर पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करता येईल.अशी मागणी मी सिडको प्रशासन तसेच खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. सदर प्रश्न मार्गी लागल्यास त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात होणार आहे. रिंग रूट झाल्यास सर्वांचा प्रवास सुलभ होणार आहे.
…..वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य