Uran : उलवे सांडपाणी प्रक्रिया केंद्राविरोधात मनसे आक्रमक

Uran Sand Pani

उरण ( विठ्ठल ममताबादे ) :

उलवे नोड या सिडकोच्या प्रकल्पातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी यांचे एकत्रित प्रक्रिया करणेसाठी सेक्टर ६ येथे उलवे खाडी लगत बांधण्यात आलेला प्रकल्प हा फक्त १०% चालू असून त्यातील सर्व प्रक्रिया ही गेले कित्येक वर्षे बंद असून सदर प्रकल्पामुळे खाडी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून सेक्टर ६ च्या आजूबाजूला असणाऱ्या गृहसंकुले यांना दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागत आहे.
अनेक नागरिकांना डेंगू, मलेरिया रोगाची लागण सुद्धा झाली आहे. त्यामुळे दूषित सांडपाणी मुळे नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आले आहे. या नागरिकांनी या समस्या विरोधात स्थानिक गावकरी आणि रहिवासी यांनी मनसेकडे गेले पाच महिन्यांपासून अनेक तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने मनसेने आजवर जवळपास ६-७ वेळा या एसटीपी प्लांट ला भेट देऊन व सिडको अधिकाऱ्यांशी बोलून त्यात सुधारणा करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरवठा केला पण तरीही त्यात कोणतीही सुधारणा आजतायगत झालेली नाही. त्यामुळे मनसे आक्रमक झाली असून स्थानिक गावकरी व उलवे नोड रहिवासी यांना घेऊन मनसे तर्फे तीव्र “तिरडी उठाव ” आंदोलन करण्यात येणार आहे.
मनसेच्या प्रमुख मागण्या,
१)एसटीपी मधील सर्व संयंत्रे चालू करून त्यांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती झाली पाहिजे.
२)सध्या कंत्राटदार असलेल्या मे. ओम इंडस्ट्रियल इंजी. सर्व्हिसेस यांची सर्व बिले रोखण्यात यावीत तसेच नित्कृष्ठ काम केलेबाबत त्यास ब्लॅकलिस्टेड करावे.
३)सदर कामाची त्वरित स्थळ पाहणी करून होतं असेलेल्या प्रदूषणासाठी दोषींवर कारवाई करावी.
४)सदर प्रकल्पात पाण्याचे घटक (जसे BOD, COD, OD, pH) नियंत्रण यंत्रणा बसवावी.
५) सदर प्रकल्पातील पाण्याचे घटक सार्वजनिक करावेत.
६)डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
यावेळी सदर प्रकल्पाची पोलखोल करताना रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित घरत, पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी, उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दशरथ मुंढे, गव्हाण विभाग अध्यक्ष आकाश श्रीकांत देशमुख, वहाळ विभाग उपाध्यक्ष राजेश परमेश्वर, गव्हाण विभाग उपाध्यक्ष प्रितम तांडेल आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading