तालुक्यात शासकीय कर्मचारी प्रिमियर भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा 2025 सर्व शासकीय कर्मचारी आयोजित स्पर्धांचे शनिवार व रविवारी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्धाटन पोलादपूरचे तहसिलदार कपिल घोरपडे यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले तर विजेत्या संघांसाठी पारितोषिक वितरण डॉ.गुलाबराव सोनावणे आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पोलादपूर पोलीस संघाने माध्यमिक शिक्षक संघावर अंतिम सामन्यात मात करीत विजेतेपदाचा करंडक आणि रोख रक्कम तर माध्यमिक शिक्षक संघाने उपविजेतेपदाचा करंडक व रोख रकमेचे पारितोषिक प्राप्त केले. आरोग्य विभागाला तृतीय तर एस.टी.कर्मचारी संघाला चतुर्थ क्रमांकाचा करंडक आणि प्रदान करण्यात आला.
शनिवारी सकाळपासून महसूल विभाग, पंचायत समिती सर्व खाते शिक्षण, कृषी, बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामसेवक संघटना विभाग, गृह विभाग पोलीस कर्मचारी, कृषी विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, पोस्ट विभाग, महावितरण, एस टी महामंडळ, आदी सर्व विभागांतील सुमारे 15 संघांनी या एसकेपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, गटशिक्षणाधिकारी संजय वसावे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, वनविभागाचे बाजीराव पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल पवार, पोलीस विभागाचे रूपेश पवार व सरणेकर, पुरवठा विभागाचे आबा जगताप, माध्यमिक शिक्षकांतर्फे विजय दरेकर व प्राथमिक शिक्षकांतर्फे सचिन दरेकर, एसटी महामंडळातर्फे सुशांत जगताप व राजेंद्र दरेकर,तसेच अन्य विभागांचे कर्मचारी मेहनत घेत होते. डॉ. दामोदर पवार, सरपंच संघटना अध्यक्ष राकेश उतेकर, अरुण मोरे, राकेश सावंत, द्वारकानाथ गुरव, सुनील पवार, नगरसेवक सिध्देश शेठ, गौरीशंकर राऊत, नागेश भुजबळ, चेतन लावंड, शूटर अरविंद जाधव यांनी याकामी सहकार्य केले.
रविवारी दिवसभरामध्ये बाद फेरीनुसार प्रथम दोन उपांत्य फेरीतील सामन्यांमध्ये एस.टी. महामंडळ आणि आरोग्य विभागाचा पराभव करून पोलादपूर पोलीस आणि पोलादपूर माध्यमिक शिक्षक संघ अंतिम फेरीत पोहोचले आणि आरोग्य कर्मचारी संघ तृतीय क्रमांकाचा तर एस.टी.कर्मचारी संघ चतुर्थ क्रमांकांचे मानकरी ठरले. अंतिम सामन्यापूर्वी पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीतगायन होऊन नाणेफेक करण्यात आली. माध्यमिक शिक्षक संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली तर पोलीस संघाने शिक्षक संघाचे आव्हान लिलया पार करीत विजेतेपदाच्या करंडकावर नांव कोरले. संपूर्ण स्पर्धेत 22 षटकार मारणारे पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज माध्यमिक शिक्षक विजय चौधरी, 8 विकेट घेणारे पोलीस हवालदार शंकर सावंत उत्कृष्ट गोलंदाज तर अप्रतिम झेल घेणारे माध्यमिक शिक्षक ॠषिकेश शेप यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपिठावरील मान्यवर डॉ.गुलाबराव सोनवणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शैलेश पालकर, पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिंदे व उपनिरिक्षक पवार, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, महसूल शाखेचे आबासाहेब जगताप, वनविभाग बाजीराव पवार, रायगड जिल्हा ग्रामविकास अधिकारी युनियनचे अध्यक्ष अनिल पवार, आरोग्य विभागाचे प्रमोद विरकर यांच्याहस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. नायब तहसीलदार सानप, रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे, महादेव मदने, इंटरनेट सुविधा सनी विचारे तसेच युटयुब लाईव्हद्वारे या सर्व क्रिकेट स्पर्धेचे प्रक्षेपण करण्यात आले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.