राज्यातील देव देवस्थानाच्या समित्यांवर अध्यक्षांसह सदस्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला असून मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर कोषाध्यक्षांसहित नव सदस्यांच्या नियुक्त्या राज्य सरकारने आज जाहीर केल्या आहेत.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे;
पवन कुमार राम सत्यभामा दया शंकर त्रिपाठी कोषाध्यक्ष श्रीमती मीना शेखर कांबळी सदस्य राहुल वैजंता तुकाराम लोंढे सदस्य भास्कर कल्याणी रामा शेट्टी सदस्य महेश शोभा अशोक मुदलियार सदस्य गोपाळ सीता रघुनाथ दळवी सदस्य जितेंद्र सहदेव राऊत सदस्य श्रीमती मनीषा अनिल तुपे सदस्य सुदर्शन सुलोचना अनंत सांगळे सदस्य भास्कर पार्वती शंकर विचारे सदस्य
या नेमणुका तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहेत. सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त कमिटीच्या अध्यक्षपदी सदानंद शंकर यांची ६ नोव्हेंबर २०२३ पासून अध्यक्ष म्हणून झालेली निवड तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहे. याबाबतचे राज्य शासनाचे परिपत्रक किशोर हिरालाल पाटील शासनाचे उपसचिव विधी व सल्लागार यांनी आज प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात या नियुक्त्यांबाबत स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.