
मुंबई :
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडिबीटीच्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर संकेतस्थळावर अनुसूचित जाती प्रवर्गातील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता १५ मेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने ही अंतिम मुदतवाढ दिलेली आहे.
यासाठी सन २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत.
👍