रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील प्रख्यात जुनी कलरकेम तर नवी हायबाखू कलरंट्स इंडिया लिमिटेड करीता कंपनीतील बंद गोदामला बुधवारी सायंकाळी उशिरा अचानक भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले होते. तर कंपनी प्रशासन व त्यांचे फायर ब्रिगेड टीम त्याच बरोबर नजिकच असलेल्या अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत त्यांना यश आले. दरम्यान, गोदामला लागलेल्या भीषण आगीत कंपनीची मोठी वित्तहानी झाली असल्याचे समजते तर घडलेल्या घटनेत गोदाम बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. त्यामुळे कंपनी प्रशासन यांसह कामगारांनी अक्षरशः निश्वास सोडला आहे.
धाटाव एमआयडीसीत बुधवारी 1 जानेवारी सायंकाळी उशिरा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हायबाख् कंपनीच्या मटेरियल ठेवणाऱ्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. ह्या आगीत कंपनीचा करोडो रुपयांचा मालसाठा भस्मसात झाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे.
सदरील हायबाख् कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याचे समजताच सबंध परिसरात चांगलीच घबराट पसरली होती. आगीच्या उंच धुराचे लोट दूरवरून दिसताच अनेकांच्या हृदयात धस्स झाले. नेमकी दुर्घटनेत काय, काय झाले असेल ? अशा शंका उपस्थित झाल्या, मात्र गोदाम बंद होते. त्याला आग लागल्याने कंपनी प्रशासनासह सर्वांनीच धीर सोडला. या भीषण आगीत कंपनीची करोडो रुपयांची नुकसान झाल्याचे प्राथमिक सांगण्यात आले. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. तसे गुरुवारी उशिरापर्यंत कंपनी प्रशासनाकडून स्पष्ट झाले नाही.
——————————————————–
याबाबत नवनिर्वाचित कारखाना निरीक्षक ए ए तांबोळी यांनी हायबाख् कंपनीला लागलेल्या भीषण आगीची चौकशी सुरू आहे. शॉक सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आमच्याकडून घटनेचा खुलासा केला जाईल. त्यासंबंधी पुढील कार्यवाही सुरू राहील अशी प्रतिक्रिया तांबोळी यांनी दूरध्वनीवरून दिली. दरम्यान, आग दुर्घटना संदर्भात हायबाख् प्रशासन लवकरच स्पष्टीकरण करणार असल्याचे वृत्त आहे.तर घडलेल्या घटनेने बाबत अधिक तपास संबधीत पोलिस खात्याकडून होत असल्याचे समजते.
——————————————————–
काल रात्री सुमारे आठ वाजता आमच्या रोहा कारखान्याकडून अर्ध प्रक्रिया केलेल्या कच्च्या मालाच्या आमच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. आमच्या कारखान्यातील सहका-यांनी शेजारील उद्योगांच्या अग्निशमन दलाच्या अतिरिक्त सहकार्याने रात्री पावणे नऊ वाजता परिस्थिती नियंत्रणात आणत मोठे सहकार्य करत ती आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. यात कोणतीही दुखापत किंवा कोणतेही जीवितहानी झालेली नाही. अपघाताच्या मूळ कारणाचा शोध घेतला जात असून नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उत्पादन प्रकल्प सुरक्षित स्थितीमध्ये आणले आहेत व वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत तसेच आमच्या उत्पादनांच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार नाही.
…अन्सार डांगे साईट हेड रोहा कारखाना.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.