Roha : पुगाव येथे हनुमान जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

Pugav Hanuman Jayanti
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील पुगाव येथे श्री पवनपुत्र हनुमंतराय यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर गावात रौप्य महोत्सवी वर्षी म्हणून हनुमान जन्मोत्सव पुगांव ग्रामस्थांच्या वतीने विधिवत धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाने मोठया जल्लोषात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
जय बजरंग क्रीडा व व्यायाम मंडळ पुगांव यांच्या सर्व सभासदांच्या चिकाटी व अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी गेली २५ वर्षांपूर्वी पुगांव गावातील ग्रामस्थ आर्थिक देणगीदार यांच्या मदतीने सर्व सभासद यांच्या सहकार्याने श्री हनुमान मंदिर सन २००० साली बांधण्यात आला होता तद्नंतर या मंदिराचे जीर्णोद्धार सन २०२४ या मध्ये करण्यात आला आल्याने आजच्या घडीला श्री हनुमान मंदिराला २५ वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी वर्षी मोठया उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
चैत्र पौर्णिमा उत्सव तसेच श्री हनुमान जन्मोत्सव शुक्रवार ११ एप्रिल २०२५ रोजी या निमित्ताने जागर म्हणून नागोठणे येथील सुप्रसिद्ध संगीत भजनाने सारे ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. व शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी पहाटे श्री हनुमान जन्मोस्तव साजरा करण्यात आला. तद्नंतर सत्यनारायण पूजा पाठ करून या ठिकाणी पालखी सोहळा खालूबाजा टाळमृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या गजारात फटाक्याच्या अतिषबाजीत लेझीम खेळत नाचत वाजत गाजत पालखी संपूर्ण गावात मोठ्या आनंदोत्सवात फिरवण्यात आली.
प्रसंगी या कार्यक्रमानिमित्ताने गावातील जेष्ठ नागरिकांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दुपारचे व रात्रीचे सर्व ग्रामस्थांकारिता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उत्सव सोहळा प्रसंगी रात्री ९:३० वाजता छत्रपती संभाजी महाराजविषयीं प्रदर्शीत छावा चित्रपट प्रोजेक्टर माध्यमातून उपस्थित ग्रामस्थ दाखवण्यात आले त्याला उत्सपूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाला युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे,  राकेश शिंदे, संजय मांडळुस्कर,प्रमोद म्हसकर,नारायणराव धनवी यांनी श्री हनुमान महाराजचे मनोभावे दर्शन घेत ग्रामस्थ मंडळाला सदिच्छा भेट दिली यावेळी मा. आमदार अनिकेत तटकरे तसेच उपस्थित मान्यवरांचे मंडळाचे अध्यक्ष राम कळमकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष राम कळमकर सर्व सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading