रोहा तालुक्यातील पुगाव येथे ग्रामस्थ युवक युवती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोलाड विभाग यांच्या वतीने शुक्रवारी २८ फेब्रुवारी ते शनिवारी २९ मार्च या कालावधीत धर्मवीर संभाजी राजे यांचे बलिदान मास म्हणून दररोज सायं.७ ते ८ या वेळेत येथे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन करून गेली महिनाभर त्यांचे पठण करण्यात आले . या गावात फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दरम्यान या बलिदान मासाचे पालन केले असून या निमित्ताने दररोज सायंकाळी संभाजी सूर्योदय श्लोक, प्रेरणा मंत्र ,ध्येय मंत्र म्हणून संभाजी महाराजांना आदराने श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती.
धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान समस्या हिंदू रक्षण धर्मासाठी आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येक हिंदू व्यक्तीने धर्मवीर बलिदान मासचे तसेच आपल्या राज्याचे नित्य आचरण काटेकोरपणे करावे ही भावना पुगाव येथील ग्रामस्थ महिला, युवक, युवती, यांच्या मनात रुतली आणि संपूर्ण श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास महिना यांचे पालन करत त्यांची पुण्यतिथी पुगाव ग्रामस्थ आणि शिवप्रस्थान हिंदुस्थान यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
तालुक्यातील पुगांव गावमध्ये फाल्गुन प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्यापर्यंत हा पूर्ण महिना बलिदान मास म्हणून पळाला गेला यामध्ये पुगांव गावातील युवक युवती व ग्रामस्थ महिला मंडळ यांनी या महिन्यात प्रत्येक जण बलिदान मास केंद्रावर जमून प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, श्री शंभू सूर्यहृदय श्लोक पठन करून ‘बलिदान मास’चे पाळन करत श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे साक्षात या प्रसंगी प्रत्यक्ष या रूपाने दर्शन घडवून आणले.
गेली चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या.. शनिवार २९ मार्च या दिवशी पुगांव गावातील समस्त ग्रामस्थ महिला व युवक युवती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी आणवानी पायानी संपूर्ण गावात मूकपद यात्रा काढून त्यांच्या बलिदान मास प्रीत्यर्थ पुण्यथित साजरी केली.
यावेळी छत्रपती संभाजी महाराजप्रती ग्रामस्थ नारायणराव धनवी, गजानन देवकर, सुधीर शेळके, चेतना म्हसकर यांनी महाराजाविषयी थोडक्यात इतिहास त्यांचे जीवन चरित्र सांगितला ज्यांच्या मुळे आज हिंदू धर्मातील मंदिरावर कळस दरात तुळस आहे महिलांच्या कपाळावर सौभाग्यलेणी कुंकू आहे असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज्यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करत त्यांना कोटी कोटी वंदन करून यावेळी कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.