रोहा तालुका खांब विभागातील मौजे चिल्हे येथील सौ.अनिता दिलीप खांडेकर यांची सुकन्या तसेच रोहा तालुका कुणबी समाज उपाध्यक्ष तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते व रोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मारुती सहदेव खांडेकर सर आणि सौ मालती मारुती खांडेकर यांची पुतणी व त्याचे बंधू दिलीप खांडेकर यांची सुकन्या भाग्यश्री दिलीप खांडेकर हि एम बी बी एस डॉक्टर नवी मुंबई येथील नामवंत असलेल्या डी वाय पाटील विद्यापीठ नेरूळ नवी मुंबई येथे ही परीक्षा उच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाली असुन प्रथमच ही कन्या एम बी बी एस डॉक्टर झाल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे तर तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर आई अनिता दिलीप खांडेकर यांची इच्छा आहे त्यासाठी ती अधिक एम डी शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून स्वप्न साकार करण्याचे ध्येय आहे.
डॉ भाग्यश्री दिलीप खांडेकर ही लहानपणापासून गुणवंत आणि हुशार असून आई वडील भाऊ उच्च शिक्षित आपली मुलगी डॉक्टर व्हावी ही तीच्या आई-वडिलांचे व काका काकीचे स्वप्न होते. तिचे आई वडील हे सौदी अरेबिया परदेशात कामानिमित्ताने राहत असल्याने तीचे संपूर्ण प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे ठाणे, मुंबई, येथे पूर्ण करत तिने मोठ्या जिद्दीने व मेहनतिने एम बी बी एस पूर्ण करून ती उत्तीर्ण होऊन ती तिचे अधिक स्वप्न साकार करण्यासाठी तसेच स्व.आजी आजोबा, नाना नानी, यांची कृपादृष्टी आई वडील,काका काकी, मामा मामी, कुटुंबातील थोर व्यक्तींचा सदैव मिळालेले आशीर्वाद आईची अधिक इच्छा पूर्ण करण्यासाठी समाज घटकातील श्रमजीवी, कष्टकरी गरीब गरजूंना चांगले उपचार व त्यांची सेवा हातून घडावी यासाठी पुढे एम डी चे उच्च शिक्षण व डिग्री घेण्यासाठी ती अमेरिका येथील विद्यापीठाद्वारे पुढील शिक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचे भाग्यश्री हिने सांगितले.
खांडेकर परिवारातील या मुलांनी उत्तम शिक्षण घेत एक चांगले नावलौकिक मिळवले आहे. भाग्यश्री अनिता दिलीप खांडेकर ही चिल्हे येथील रहिवासी असून ती डॉक्टर व्हावी अशी तिच्या आईची नितांत इच्छा होती तिचा भाऊ नीरज दिलीप खांडेकर हा देखील युएस मध्ये एम बी ए मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेला असून तो अमेरिकेत शिक्षण घेत पुढील जॉब देखील करत आहे. तर भाग्यश्री ही एम बी बी एस परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण झाली.
डॉ.भाग्यश्री ही चिल्हे गावातील कुणबी समाजातील मुलगी असुन फक्त कुणबी समाजाचेच नाही तर संपूर्ण गावाचा नाव रोशन केला आहे. तिच्या या यशाबद्दल डॉ.भाग्यश्री दिलीप खांडेकर हिचे डी वाय पाटील विद्यापीठ ,खांब पंचक्रोशी तसेच तालुका व रायगड जिल्हा कुणबी समाज त्याच बरोबर सर्व क्षेत्रातील समाज बांधव व त्यांचे सर्व पदाधिकारी सदस्य, चिल्हे ग्रामस्थ, व सामाजिक संस्था त्यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य, महिला वर्ग,तरुण वर्ग यांनी व्यक्तिशः तसेच मोबाईल वॉट्सअप द्वारे अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत भाग्यश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.