रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चणेरा आणि तलवडे गावातून दोन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उघडकीस आली आहे. या तरुणी अद्याप घरी परतल्या नसून, कुटुंबीयांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पहिल्या प्रकरणात, चणेरा गावातील पूर्वा शैलेश साळवी (वय 20) ही तरुणी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास मामाच्या मुरुड येथील गावाला जात असल्याचे सांगून घरातून निघाली. मात्र, ती अद्याप मुरुड येथे पोहोचलेली नाही. यामुळे तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत, तलवडे गावातील मानसी विनायक शिगवन (वय 23) ही 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता मुंबई पार्ले येथे जाण्यासाठी घरातून निघाली. ती रोहा रेल्वे स्थानकातून रोहा-दिवा पॅसेंजर गाडीत बसून निघाली असली तरी नियोजित स्थळी पोहोचली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी तिच्या चुलत बहिणीने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नरेश मोरे करत आहेत. बेपत्ता तरुणींचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.