रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशी भक्तीसागरात दुमदुमली अखंड हरीनाम सप्ताहात भाविकांची अलोट गर्दी, जणू धाकटी पंढरी म्हणून भक्तीचा पूर उसळला गेली सात दिवस मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेला खांब पंचक्रोशीचा ६८ वे.अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह व भागवत कथा सोहळा मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे संपन्न होत आहे. त्या प्रीत्यर्थ मंगळवारी २५ मार्च रोजी सहाव्या दिवसाची किर्तन रूपी सेवा ही श्री क्षेत्र भगवान गड येथील न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली तर यावेळी त्यांचे स्वागत तळवली ग्रामस्थ,महीला, व युवकांनी मोठ्या जल्लोषात करत उपस्थित वारकरी संप्रदाय भाविक भक्तगणांनी भक्तीचा आनंद लुटला.
कोकण वाशियांचे श्रद्धास्थान सद्गुरू गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरूवर्य गोपाळ महाराज वाजे, गुरूवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच हभप नारायण दादा वाजे हभप दत्तू महाराज कोल्हटकर (पंढरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली हभप रायगड भूषण डॉ. मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाखाली खांब पंचक्रोशीचा हा अखंड हरिनाम सप्ताह परंपरेनुसार मौजे तळवली येथे आयोजित करण्यात आला असुन याला भव्य दिव्य स्वरूप तसेच जणू काही भक्तीचा महापूर प्राप्त झाले आहे.
कीर्तन रूपी सेवा करण्यासाठी आलेले महाराज महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांचे स्वागत येथील युवक मंडळानी मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरण खांब ते तळवली दरम्यान रथ यात्रा, बाईक रॅली, खालु बाजा टाळ मृदुंगाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत रंगी बेरंगी फुलांची पुष्पवृष्टी करून महिलांनी विविध वेशभूषा परिधान करून किर्तनकार महाराज यांचे आगमन स्वागतासाठी सज्ज झाले होते .
कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीची वैभवशाली परंपरा तसेच साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खांब पंचक्रोशीत लाभलेल्या पंचक्रोशीतील यजमान श्री क्षेत्र तळवली येथे गेली सात दिवस चालत असलेला हा हरीनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण व भागवत कथा, उत्सव आनंदाचा गजर कीर्तनाचा सोहळा जय जय राम कृष्ण हरी मंत्र जप कीर्तन महोत्सव तळवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असल्याने येथील ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या सजावटीतून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कलाकृती सादर करत फटाक्यांच्या आतषबाजीने यावेळी महाराजांचे स्वागत करण्यात आले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.