जिल्हा यांसह रोहा तालुक्यात वणवा भयभीत समस्या होत आहे. दररोज लागणाऱ्या वणव्यात जंगल, पशू प्राणी अक्षरशः होरपळून जात आहेत, आधीच कळसगिरी व अन्य जंगले आगीच्या भस्मस्थानी पडले. निसर्गप्रती लोकांच्या बोथड जाणीवा, लोकप्रतिनिधी, प्रशासन मुख्यतः वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव असतानाच गुरुवारी सायंकाळी उशिरा धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या रौद्ररूपी वणव्यात अनेक घरे जळून खाक झाली, संसार उघड्यावर आले, वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता, त्यातच वाऱ्याचा जोश असल्याने घरे भस्मसात होण्याची भीतीदायक घटना घडली तर वणवा आगीचे वृत्त समजताच प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.
तालुक्यातील सर्वच जंगलाना वणवा लागण्याची परंपरा आताही कायम राहिली. राजरोस अनेक जंगल, गवताचे मैदानाना वणवा लागला, वणवा लागत आहे, राब भाजण्याच्या गडबडीत वणवा लागण्याचा प्रमाणातही अलीकडे मोठी वाढ झाली, गावठी हातभट्टी, कोळसा उत्पादनही वणव्याला प्रभावित करत आहे, याकडे वन विभागाचे होणारे दुर्लक्ष जंगलांच्या मुळावर उठत आहे.
वणवा विझविण्यासाठी कोणतीच तत्पर यंत्रणा नाही, वाढता लोक सहभाग नाही. मार्च प्रारंभीच जंगले जळत असतानाच वन विभागाचा हलगर्जीपना अखेर इंद्रदेव वाडीतील घरांवर बेतला. डोंगर माथ्यावरील इंदरदेव धनगरवाडीला गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक वणवा लागला. वणव्याने रुद्ररूप धारण करत वस्तीतील संपूर्ण घरे जळून खाक झाली. यात सांसारिक सामानाची अक्षरशः राखरांगोळी झाल्याची भयावता अधोरेखित झाली.
वणव्यात नियंत्रणासाठी कोलाड येथील एसव्हीआर, एसएसटीम, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अनेकांनी शर्थीचे प्रयत्न करून वणवा नियंत्रणात आणले.घटनेची मिळताच प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख यांसह सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित ग्रामस्थांना धीर दिला तर तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
दरम्यान, वणव्यात घरांची होळी झाल्याने बाधित कुटुंबांचे लवकरच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे, अद्याप कोणीच आमदार, खासदार यांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही, घटनास्थळाला भेट दिलेली नाही, तर आता वाढत्या वणव्यावर नियंत्रण, वणवा लावणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची मोहीम वन विभाग आतातरी उघडून शुद्धीवर येईल का ? हे समोर येणार आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.