Raigad Shiv Jayanti : तासनतास मंत्र्यांची वाट बघत बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर; उत्सव राजकीय नेत्यांच्या सोयीसाठी?

Raigad Shivjayanti Waitung Student
महाड (मिलिंद माने) :
छत्रपती शिवाजी महाराजांना देखील राज्यकर्त्यांनी सोडलेले नाही याचा उत्तम पुरावा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ शिवजयंती रायगडावर साजरी होत असताना शिवजयंती उत्सवासाठी आलेल्या हजारो शाळकरी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून भर उन्हात ताटकळत बसावे लागण्याची वेळ आज रायगडावर शिवजयंती उत्सवानिमित्त पाहण्यास मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे ३९५शिवजयंती उत्सव राज्य सरकारकडून साजरा केला जातो, या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर येतात आज या सोहळ्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शिवजयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. सकाळी आठ वाजल्यापासून रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झाले होते, मात्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री कुमारी आदिती तटकरे या तब्बल बाराच्या सुमारास रायगडावर दाखल झाल्याने शिवजयंती उत्सवाला तीन तास विलंब झाला.
Raigad Shivjayanti
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर साजरा झालेल्या शिवजयंती उत्सवासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याबरोबर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छ*** चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह संभाजी महाराजांची भूमिका चित्रपटात करणारे विकी कौशल हे गडावर येणार असल्याने या कार्यक्रमासाठी तब्बल तीन तास विलंब झाला. यामुळे या कार्यक्रमासाठी आलेल्या माणगाव तालुक्यातील जावळी येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना भर उन्हात शिवजयंती उत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांची वाट बघत ताटकळत बसावे लागले भर उन्हाच्या तडाक्यात शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होते मात्र प्रशासनाकडून ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली नव्हती त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना पदरमोड खर्च करून माझ्या बाटल्या विकत घ्याव्या लागत होत्या.
प्रशासनाचा हलगर्जीपणा याला जबाबदार कोण?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारातील असणाऱ्या मेघ डमरी वर दरवर्षी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात सजावट केली जाते. मात्र प्रशासनाने यावर्षी तात्पुरत्या दिखाऊ स्वरूपात मेघडंबरीवर फुलांची रोषणाई करून आपले सोपस्कार पार पाडले तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान सभा मंडप व शामियाना उभारण्यात येतो तसा शामियाना किंवा सभामंडप प्रशासनाने शिवजयंतीच्या सोहळ्यानिमित्त का उभारला नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकंदरीत राजकीय सोयीसाठी शिवजयंती उत्सवाचे सोपास्कार पार पाडणाऱ्या प्रशासनावर राज्य सरकार की लोकप्रतिनिधी मेहरबान झाले असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading