
अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड मेडिकल असोसिएशनची 28 वी दोन दिवसीय परिषद व स्नेहासंमेलन डॉ. निशिगंध आठवले यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग मधील आर.सी.एफ सभागृहात पार पडली.
रायगड जिल्ह्यातील 600 हुन अधिक डॉक्टर्स रायकॉन 25 या वार्षिक सोहळ्यातमध्ये सहभागी झाले होते.
पद्मश्री डॉ. एस. नटराजन आणि पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याबरोबरच भारतातील वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या तज्ञ डॉक्टरांनी या परिषदेमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले.
रायगड मेडिकल असोसिएशन ही संपूर्ण रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे. असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणजे रायकॉन आहे. जिल्ह्यातील ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद व्यासपीठ, युनानी व दंतशल्यचिकित्सा या स्पेशालिटीजचे डॉक्टर्स एकत्र यावे व नवीन काहीतरी शिकायला मिळावे या उद्देशाने रायकॉन चे दरवर्षी आयोजन केले जाते.
यावर्षी 28 वी रायकॉन अलिबाग मध्ये घेण्यात आली. या परिषदेचे उदघाट्न अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरखेल कन्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, आर. सी. एफ. चे व्यवस्थापक नितीन हिरडे, रायगड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, सेक्रेटरी डॉ. राजेंद्र चांदोरकर, खजिनदार डॉ. नवलकिशोर साबू, डॉ. विनीत शिंदे, डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. संजीव शेटकार, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. किरण जैन, डॉ. गणेश गवळी,डॉ. राजाराम हुलवान, डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. निखिल जानी, डॉ. कीर्ती साठे, डॉ. विनायक पाटील, डॉ. आशिष भगत, डॉ. संदेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमर पाटील यांनी संपदीत केलेल्या व जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांची यशोगाथा सादर करणाऱ्या “रायकॉन 2025” या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील मागील 50 वर्षे रुग्णांना सेवा देणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा आणि मागील 27 वर्षे रायगड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
एक दिवस स्वतःसाठी या संकल्पनेतून आयोजित केलेल्या संस्कृतिक कार्यक्रमाला सिने अभिनेत्री श्रुती मराठे आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख सौ. चित्रलेखा नृपाल पाटील यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रायकॉन सुंदरी 2025 या स्पर्धेत डॉ. भाविका कल्याणी यांनी रायकॉन सुंदरी 2025 चा मान पटकावला. या मनोरंजनाच्या कार्यक्रमात अनेक डॉक्टरांनी आपली कला सादर केली.