Raigad : ‘शेकाप’च्या चार जागांवरील उमेदवारी मार्ग मोकळा; पक्षात आनंदाचे वातावरण

Shekap Umedvar
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकापक्ष) चार प्रमुख विधानसभा जागांवरील उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे, पनवेलमधून बाळाराम पाटील आणि उरणमधून प्रीतम म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
 या चार नेत्यांची निवड करून शेकापक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. अनेक दिवसांपासून या जागांवरील उमेदवारीवर अनिश्चितता होती. मात्र,  शेकापक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलिबागमधून चित्रलेखा पाटील:
चित्रलेखा पाटील या अलिबागमधील लोकप्रिय नेत्या असून, त्या शेकापक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. त्यांना पहिल्यांदाच ही संधी पक्षाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शेकाप नेते जयंतभाई पाटील यांच्या त्या सूनबाई आहेत.
पेणमधून अतुल म्हात्रे:
अतुल म्हात्रे हे पेण तालुक्यातील एक प्रखर नवोदित नेते असून, त्यांनी शेकापक्षाच्या विचारधारेची चांगली सांगड घातली आहे. त्यांना पहिल्यांदाच ही संधी पक्षाकडून देण्यात आली आहे.
पनवेलमधून बाळाराम पाटील:
पनवेल विधानसभा मतदारसंघातून बाळाराम पाटील हे उमेदवारीसाठी निवडण्यात आले आहेत. आतापर्यंत त्यांना निवडणूक लढविण्याचा तगडा अनुभव आहे
उरणमधून प्रीतम म्हात्रे:
प्रीतम म्हात्रे हे उरण मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, ते शेकापक्षाच्या तरुण नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना सुद्धा पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
शेकापक्षाच्या या चार नेत्यांना महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading