सिक्कीम राज्यातील कर्तव्यावर असताना पंधरा महिन्यांपूर्वी अचानक धरण फुटल्याने सैन्याची पूर्णपणे तुकडी (दल) वाहून गेली होती. यामध्ये भारत देशाच्या सेवेसाठी तत्पर असणारा रायगड जिल्ह्यातील कार्लेखिंड ते हशिवरे मार्गावरील भारतीय जवान सुयोग अशोक कांबळे या शहीद जवान याचा समावेश होता. शहीद जवान सुयोग अशोक कांबळे यांना आज भारतीय लष्करी इतमामात त्याच्या गावी मानवंदना देण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील नारंगी गावातील मौजे बौद्धवाडी येथील रहिवाशी असलेला सुयोग कांबळे हा भारतीय लष्करात गेली अठरा वर्षे कार्यरत होता. जवान सुयोग कांबळे हा ४ ऑक्टोंबर २०२३रोजी भारतातील सिक्कीम या राज्यात त्याच्या तुकडीसह कार्यरत होता. रात्रीच्या वेळी अचानक धरण फुटल्याने सुयोग कांबळे यांच्यासहित त्याची तुकडी (दल) हे पूर्णपणे वाहून धरणाच्या पाण्यात बेपत्ता झाले होते. त्याचा शोध सिक्कीम राज्याने घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे प्रयत्न हे व्यर्थ गेले होते. भारतीय लष्करी नियमाप्रमाणे भारतीय जवान सुयोग अशोक कांबळे यास शहीद घोषित करण्यात आले.
आज रविवारी सैन्यदलाकडून अलिबाग जवळील कार्लेखिंड ते शेखाचे गाडीने येवून नंतर नारंगी पर्यत रॅली काढण्यात आली होती. शासकीय इतमात शहीद कांबळे यास त्याच्या घरी मानवंदना देण्यात येणार आली. यावेळी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, आमदार महेंद्र दळवी, प्रांतअधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रमराव पाटील पंचक्रोशीतील शोकाकुल रहिवासी आदी सहित अलिबाग तालुका सहित जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.