Raigad : जिल्ह्यात सण,उत्सव कालावधीकरिता मनाई आदेश जारी

Raigad : जिल्ह्यात सण,उत्सव कालावधीकरिता मनाई आदेश जारी

अलिबाग :

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठया प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो.
रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गांवामध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधुन मधुन वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम हा माहीती कार्यालय युक्तीमध्ये जातीय तणावाच्या घडना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे.
दि.25 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यावतीने रूपाली नाकाडे, अध्यक्ष अमेदा या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देवून सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दि.28 ऑगस्ट 2024 रोजी प्रसाद जयराम तिखंडे हे कर्जत तालुक्यातील नागरीकांची रखडलेली शासकीय कामे, मागण्या, अडचणी व होणाऱ्या अन्यायाबाबत न्याय मिळावा तसेच कर्जत तालुक्यातील सर्व सामान्य लोक प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत असतात तरीही न्याय मिळत नाही, शासकीय कामे पार पाडण्यास दिरंगाई होते कर्जत तालुक्याचा प्रशासकीय कारभार कायदेशीर व नियमानुसार न चालता हुकूशाहीने व मनमानी पध्दतीने चालतो त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी मागणी करीता प्रांत कर्जत यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसलेले असून सदरचे उपोषण सुरू आहे.
दि.30 सप्टेंबर 2024 रोजी अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीने लकी जाधव यानी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राज्य सरकारने आंदोलन करणार आहेत बळी पडू नये यासाठी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. अलिबाग पोलीस ठाणे  हद्दीत दि.30 सप्टेंबर 2024 रोजी अंजली अरूण मुदस यांची 2015 पासून बिल्डर लॉबी गजानन अंकुश दळवी व इतरांनी जमीनीच्या संदर्भात आर्थिक व मानसिक खच्चीकरण केलेले आहे. याबाबत चौकशी करून तात्काळ दोषीविरुध्द कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवालाची प्रत न मिळाल्यास अंगावर पेट्रोल ओतून जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे आत्मदहन करणार आहेत.
महाड पोलीस ठाणे हद्दीत दि.02 ऑक्टोबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय महाड येथे प्रा.डॉ. सुभाष रामराव कदम हे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राचे हद्दीत दि.03 ऑक्टोबर 2024 ते दि.12 ऑक्टोबर 2024 रोजी दरम्यान हिंदु बाधवाचा नवरात्रौत्सव हा सण साजरा होणार आहे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राचे हद्दीत दि.12 ऑक्टोबर 2024 रोजी बौध्द बांधवांचा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येणार आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दि.07 ऑक्टोबर 2024 रोजी मौजे तोनविरा थांब्यावर जेष्ठ नागरीक संस्था कामाले विभाग यांच्यावतीने बळवंत वालेकर हे अलिबाग व मुरूडकडे येणाऱ्या सर्व जलद गाड्या थांब्याव्यात या मागणीसाठी रास्ता रोको करणार आहेत.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, नमूद औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी. तसेच सण उत्सव व राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी 00.01 वा. ते दि. 12 ऑक्टोंबर 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत या कालावधीकरीता मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) मधील (अ), (ब), (क), (ड), (ई) व (फ) प्रमाणे खालील कृत्ये करण्यास या अधिसूचनेद्वारे प्रतिबंध करण्यात आली आहेत. 
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, वंदूका, सुरे काठया किंवा लाठया अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे. अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे. सभ्यता अगर निती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सॉग करणे, चित्र, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तु, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकोस मनाई राहील.
तसेच सदर अधिसूचना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे. अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही.
ही अधिसूचना ही खऱ्या प्रेत यात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही. तथापि, सदर कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणूका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर राहील, या अटीवर परवानगी द्यावी.
०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading