मुंबई-गोवा महामार्गाच्या कामादरम्यान अपघातग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ अंतर्गत रायगड पोलीस विभागातर्फे जीवनदूत सन्मान सोहळा आर.सी.एफ. सभागृह कुरुळ येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आ. महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मंत्री गोगावले यांनी जीवनदूतांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत शासनस्तरावरून सहकार्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मदत करणाऱ्या स्वयंसेवकांना संरक्षण देण्याची भूमिकाही स्पष्ट केली.
कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, बस व रुग्णवाहिका चालक यांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.