अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयअंतर्गत असणाऱ्या प्रसुती विभागातून दीड लाख रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याप्रकरणी तेजश्री सतिश कोळी (वय 31 वशें, व्यवसाय- नोकरी, रा. मु. पो. केळवणे दत्तमंदिर मोठाकोळीवाडा, ता. पनवेल, जि. रायगड) यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तेजश्री कोळी या दिनांक 07/02/2025 रोजी 12.00 वाजणेचे सुमारास बहिण सुश्मीता रोहन कोळी (वय 27 वर्शे रा. रेवस ता. अलिबाग, जि. रायगड) हीचे तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते. त्यावेळी तिथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी यांनी डॉक्टरांनी सुश्मीता रोहन कोळीचा रक्तदाब वाढला असल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागेल असे सांगितल्याने तेजश्री व सुश्मीता यांना प्रसुतीगृह विभागात वॉर्ड मध्ये एक सिस्टर बरोबर घेवून गेली होती.. प्रसुती विभागामध्ये आल्यावर आम्हाला कॅमे-या समोर उभे ठेवले व फिर्यादी यांच्या बहिणीकडे असलेल्या वस्तू काढण्यास सांगितले तेव्हा सुश्मिता हिच्या गळ्यातील मंगळसुत्र व कानातील कुडी व नाकातील चंमकी वगैरे सर्व दागीने काढून बॅगेत ठेवल्यानंतर फिर्यादी तेजश्री ही बॅग घेवून सुस्मिताला घेवून सर्व ठिकाणी तपासणीस फिरत होते.दुपारी 12.15 वाजताचे सुमारास फिर्यादी यांच्या बहिणीची वैदयकिय तपासणी होत असताना तेथे असणारी एक सिस्टर फिर्यादी यांना सांगितले की, फिर्यादी यांना त्यांच्या रूम मध्ये बॅग ठेवण्यास सांगितले. आणि सांगितले की या रूम मध्ये कोणाही जात नाही असे सांगण्यात आले होते.
नंतर त्या सिस्टरने आमचे हातात एक नमुना लघवी काढण्यासाठी पटटी दिली त्यावेळी फिर्यादी जवळील दागीने ठेवलेली बॅग समोरच्या ड्रेसिंग रूममध्ये सिस्टरने ठेवण्यास भाग पाडले.फिर्यादी व त्यांची बहीण ही लघवीचा नमुना पटटीवर घेणेसाठी बाथरूम जावून आले त्या दरम्यान एक सिस्टर व दोन तीन मिनीटानी एक काम करणारी मावधी ड्रेसिंग रूम मधुन जावून आली होती. फिर्यादी व त्यांची बहीण लघवीचा नमुना घेवून आल्या नंतर फिर्यादी ह्या ड्रेसिंग रूम मध्ये बॅग चेक करण्यासाठी गेले असताना ड्रेसिंग रूमचे उंबरठ्याजवळ फिर्यादी यांना चमकी बांधलेली पुडी मिळाली. म्हणून फिर्यादी या बॅग बघायला गेले त्यातला पॉकेट काढून बघितले तर बहीणीचे 1, लाख 5 हजार रूपये किमतीचे आडीच तोळे वजनाचे सोन्याचे साखळीत सोन्याचे मणी व काळे मणी असलेले तीन सरी डाव मणी असलेलेमंगळसुत्र चोरीस गेलेले आढळून आले.
फिर्यादी यांच्या बॅग मधील सोन्याचे साखळीत सोन्याचे मणी व काळे मणी असलेले तीन सरी डाव मणी असलेले मंगळसुत्र चोरीस गेल्याचे सांगितले असता फिर्यादी यांना सांगण्यात आले की प्रसूती विभागातील कार्यरत असणारे सर्व कर्मचारी यांना उपस्थित करतो असे सांगण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी रुग्णालयात अधिक चौकशी केली. दिनांक 11/02/2025 रोजी फिर्यादी यांनी सीसीटीव्ही कॅमे-यातील व्हिडीओ क्लिप पाहीले असता त्यामध्ये फिर्यादी व त्याची बहिण गेल्याचे व ड्रेसिंग रूम मध्ये कोण कोण जात होते ते भाग दाखविले नाही. व तेथे काम करणारी मावशीचे नाव नाव शकुन नाईक असे समजले.
याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याबाबत अलिबाग रुग्णालयात अधिक माहिती घेतली असता चोरीचे तसेच रुग्ण तथा रुग्ण यांचे नातेवाईक यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचे देखील अनेक प्रकार घडले असल्याचे काही नातेवाईक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
————————————————
जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागात चोरीची घटना घडली आहे हे दुर्देवी घटना असून यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच कोणी कर्मचारी यांनी रुग्ण यांच्या नातेवाईक यांच्याकडे पैसे मागितले तर त्यांनी तक्रार करावी असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निशिकांत पाटील यांनी केले. आहे.