Poladpur: हरित लवादाने दंड ठोठावूनही सावित्री नदीपात्रामध्ये शहरातील कचरा टाकणे सुरूच, विरोधी गटनेता आक्रमक

Poladpur Kachara Depo
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रामध्ये शहरातील कचरा टाकण्याचा प्रकार पोलादपूर नगरपंचायतीकडून सुरू असून यामुळे परिसरातील पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक समस्या गंभीर बनल्या आहेत. यापूर्वी अशाच प्रकारामुळे हरित लवादाकडून ७ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता, तरीही हे प्रकार सुरूच आहेत.
नगरपंचायतीने ७९ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून कचरा गोळा करून सावित्री नदीपात्रात टाकण्याचे काम सुरू केले आहे. विरोधी गटनेता दिलीप भागवत यांनी या प्रकाराला कडाडून विरोध दर्शवला असून, यावर योग्य उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कायदेशीर निकषांचा भंग
सरकारी नियमानुसार नदीपात्रापासून १०० मीटर आणि महामार्गापासून २०० मीटर अंतरावर डम्पिंग ग्राऊंड तयार करणे बंधनकारक आहे. मात्र, नगरपंचायतीने स्मशानभूमीजवळील जागेत डम्पिंग ग्राऊंड तयार करून नियमांचा भंग केला आहे. यामुळे नदीपात्रातील जैवविविधतेस मोठा धोका निर्माण होत असून, सार्वजनिक आरोग्यालाही धोका आहे.
विरोधकांचा आरोप
विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून सावित्री नदीपात्रात कचरा टाकणे थांबवण्याची मागणी केली आहे. १५ दिवसांत योग्य पावले उचलली गेली नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पर्यायी जागेचा अभाव
डम्पिंग ग्राऊंडसाठी सावंतकोंड, पार्टेकोंड, आणि चोळई येथील जमीनमालकांशी चर्चाही झाली होती. मात्र, प्रस्तावित रक्कम कमी असल्याने जमिनीचे भूसंपादन झाले नाही. यामुळे पर्यायी जागेचा अभाव असल्याचे नगरपंचायतीने सांगितले.
विरोधकांचे पुढील पाऊल
नगरपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी योजना राबवली नाही, तर यावर आंदोलन करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. कचरा व्यवस्थापन ठेकेदाराकडून कामगारांची हजेरी आणि कामावर देखरेख कशी होते, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
स्थानीय लोकांचा आवाज
पोलादपूरमधील नागरिकांनी या प्रकाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणीय हानीसह आरोग्यविषयक संकट ओढवण्याची भीती आहे.  प्रशासनाने आणि पर्यावरणीय संस्था यांनी यात हस्तक्षेप करून सावित्री नदीच्या संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी स्थानिक जनतेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading