Poladpur: लोहारे आणि देवळे जिल्हा परिषद गट निवडणुकीचे वेध; इच्छुकांच्या मनात आशेचे धुमारे न् नैराश्याचा खेळ

Poladpur Map
पोलादपूर (शैलेश पालकर) :
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलादपूर तालुक्यातील देवळे आाि लोहारे या रायगड जिल्हा परिषदेच्या गटांच्या तसेच लोहारे गटांतर्गत लोहारे आणि कोंढवी गण तसेच देवळे गटांतर्गत देवळे आणि गोवेले गणांतर्गत चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर इच्छुकांच्या मनात आशेचे धुमारे न् नैराश्याचा खेळ सुरू असल्याने आतापासूनच कोणी चर्चेत येण्यासाठी मानसिकदृष्टया सक्षम नसल्याचे जाणवत आहे.
पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पोलादपूरचे मतदार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान करू शकणार नसल्याने आता तालुक्यातील मतदार लोहारे गट आणि या गटांतर्गत लोहारे आणि कोंढवी गण तसेच देवळे गट आणि या गटांतर्गत देवळे आणि गोवेले गणांतर्गत मतदान करणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्हा परिषद आणि पोलादपूर पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या असल्याने प्रशासक नियुक्त करून कामकाज सुरू आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाचा निकाल होत नसल्याने रखडलेल्या या निवडणुकांबाबत राज्यसरकार स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सूतोवाच केल्यामुळे यंदा रायगड जिल्हा परिषद आणि पोलादपूर पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची आशा इच्छुक उमेदवारांच्या मनात जागी झाली आहे.
लोहारे पंचायत समिती गणातील सवाद 1, सवाद 2, कणगुले, पार्ले, लोहारे 1, लोहारे 2, चरई, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, तुर्भे खोंडा, वझरवाडी, दिविल ही 12 मतदान केंद्रं तर कोंढवी पंचायत समिती गणातील काटेतळी, सडवली, कोंढवी, महालगुर, ओंबळी, कोतवाल खुर्द, परसुले, कोतवाल बुद्रुक, कुडपण बुद्रुक, पैठण, भोगाव खुर्द, महाळुंगे, मोरगिरी, मोरगिरी फौजदारवाडी, धामणदिवी, देवपूर, पळचिल, गोळेगणी ही 19 मतदान केंद्रं अशी एकूण जिल्हापरिषदेच्या लोहारे गटांतर्गत 31 मतदान केंद्रं अस्तित्वात आहेत.
गोवेले पंचायत समिती गणातील गोवेले, ढवळे, उमरठ, धारवली, आंग्रेकोंड, कालवली, मोरसडे, सडे, बोरघर, कामथे, वडघर बुद्रुक, आडावळे बुद्रुक, बोरावळे 1, बोरावळे 2 गुडेकरकोंड, रानवडी बुद्रुक, घागरकोंड, माटवण ही 17 मतदान केंद्रं तर देवळे पंचायत समिती गणातील देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण 1, वाकण 2, नाणेघोळ, कापडे खुर्द, रानकडसरी, कापडे बुद्रुक 1, कापडे बुद्रुक 2, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर ही 17 मतदान केंद्रं अशी एकूण जिल्हापरिषदेच्या देवळे गटांतर्गत 34 मतदान केंद्रं अस्तित्वात आहेत.
मागील वेळी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हापरिषदेच्या 58-देवळे गटांत शेकापक्षाच्या सुमन कुंभार तर देवळे 116 पं.स.गणात काँग्रेसचे शैलेश सलागरे आणि शेकापक्षाच्या नंदा चांदे असे तीन उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी जिल्हापरिषदेच्या 59-लोहारे गटांतर्गत शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे तर लोहारे 117 पं.स.गणात शिवसेनेचे यशवंत कासार आणि कोंढवी 118 गणात दिपिका महेश दरेकर असे तीन उमेदवार निवडून आले होते.  2017च्या निवडणुकीवेळी शेकापक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच बहुजन मुक्ती पार्टी अशा राजकीय पक्षांनी उमेदवार उभे करूनही मतदारांनी मोठया प्रमाणात नोटा बटनावर मतदान केल्याने निवडणुकीचे अपेक्षित निकाल बदलले होते.
मात्र, आगामी निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीप्रमाणे आरक्षणाचा चक्रानुक्रम बदलण्याचा प्रकार घडल्यास निवडणूक विभागाकडून अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या लोकसंख्येला प्रतिनिधीत्व टाळले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी चक्रानुक्रमे आरक्षणाचा विचार करताना सांख्यिकी विभागाने 2011च्या जनगणनेचा हवाला घेऊन काम करण्याऐवजी प्रस्तावित जनगणनेचा विचार करून आरक्षण जाहिर करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading