Poladpur: रस्त्याच्या साईडपट्ट्या हरवल्या; कोट्यवधीचा भ्रष्टाचार, मलिदा खाणारे पुढारी मात्र नामानिराळे

Poladpur Road
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील बहुचर्चित कापडे कामथे रस्त्यावरील साईडपट्टयांवर गेल्या महिन्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे गुरूजींच्या मोहिमेवेळी भराव टाकला होता. मात्र, सद्यस्थितीत साईडपट्टया हरवल्या असून मोटारसायकलस्वार रस्ता सोडताच मोटारसायकली कोलमडत असून एस.टी.बसेस झोकात जात असल्याचे दिसून येत आहे.
सुमारे पावणेसहा कोटी रूपये खर्चाच्या या कामामध्ये तब्बल तीन कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा राजकीय तसेच ठेकेदारी वर्तुळात होत असताना या रस्त्याच्या दूरवस्थेची जबाबदारी मात्र अभियंता आणि ठेकेदारावरच टाकली जात असल्याने मलिदा खाणारे काही पुढारी नामानिराळे राहण्याची चिन्हे दिसू लागली. अखेरीस, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य अभियंता सी.डी.फकीर यांनी पुणे येथील राज्याच्या विशेष गुणवत्ता नियंत्रकांमार्फत रस्त्याच्या दर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
या विभागाचे गुणवत्ता नियंत्रक शिंदे या कामासाठी रायगड जिल्ह्यात दाखल झाले असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे अधिक्षक अभियंता व्ही.डी.पाटील हे देखील या रस्त्याची पाहणी करण्यासाठी या चौकशी पथकासोबत अथवा स्वतंत्रपणे रवाना होणार आहेत. या आदेशाचे पत्र राज्याचे मुख्य अभियंता सी.डी.फकीर यांच्या कार्यालयातून 3 मार्च 2010 रोजी जारी झाले होते. मात्र, अद्याप या चौकशीचा अहवाल आणि त्यानुसार कारवाई न होता केवळ चौकशीचा बनाव केल्याची शक्यता यामुळे चर्चेत येत आहे.
दरम्यान, डेप्युटी इंजिनियर सी.एम.आंबटकर हे मे 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले असून डिसेंबर 2016 पर्यंत कापडे ते कामथे प्रधानमंत्री ग्रामसडकेवरचे हे प्रकटलेले खड्डे बुजविण्याचा प्रस्ताव होईल आणि योजनेमार्फत खड्डे बुजविण्याचे काम त्यानंतर सुरू होईल अशी अपेक्षा असताना या रस्त्यावरील पाच पुलांचे प्रस्ताव करण्यात आले आणि सद्यस्थितीत हे काम सुरू आहे.
मात्र, रस्त्याच्या दोन्हीबाजूंच्या साइडपट्टयांवरील माती वाहून गेल्यामुळे रस्ता आणि साईडपट्टी यामध्ये सहा इंचाहून अधिक उंचवटा आणि खोलगटपणा निर्माण झाल्याने एस.टी.बसेस रस्त्यावरून बाजूला न झाल्यास मोटारसायकलस्वारांना साईडपट्टीवर उतरताना त्रेधातिरपिट उडून मोटारसायकली कोलमडत असल्याचे अनेकदा पाहण्यास मिळाले आहे. गडकोट मोहिमेदरम्यान उमरठ येथून संभाजी भिडे गुरूजींची रायगडपर्यंत धारातिर्थ यात्रा सुरू झाली. तत्पुर्वी या रस्त्याच्या साईडपट्टया काही ठिकाणी लालमातीने भरण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांशी भागातील साईडपट्टी रस्त्यापासून सहा ते 10 इंच खोल गेल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading