नगरपंचायत पोलादपूरचे उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्या राजिनाम्याने रिक्त राहिलेल्या सार्वजनिक आरोग्य मालमत्ता कर विषय समितीचे पदसिध्द सभापती पद आता प्रसाद इंगवले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदासह फिक्स झाले आहे. सोमवारी या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
दि. 30 जानेवारी 2025 रोजी विविध विषय समितीच्या निवडीवेळी सार्वजनिक बांधकाम समिती सभापती सिध्देश संजय शेठ यांची निवड झाली. पाणीपुरवठा व दिवाबत्ती समितीच्या सभापतीपदी निखिल कापडेकर, भाजपच्या अंकीता निकम जांभळेकर यांना नियोजन, अर्थ, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती पद, महिला बालकल्याण सभापतीपदी सुनिता पार्टे यांची निवड झाली आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्य मालमत्ता कर विषय समितीचे पदसिध्द सभापती पद रिक्त राहिल्याने उपनगराध्यक्ष नागेश पवार यांच्या राजिनाम्याचा सुगावा लागला.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये यंदा प्रथमच विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला सत्ताधारी नगरसेवकांनी सूचक अनुमोदक म्हणून सह्या करून विषय समितीचे सभापती पद बहाल केल्याची घटना घडली असून यावर विरोधी गटनेत्यांनी कोणतीही पक्षांतरबंदी अथवा पक्षविरोधी कारवाईचा बडगा न उगारल्याने आणखी काही विरोधी नगरसेवक येत्या काळात सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याच्या तयारीत आहेत.
पोलादपूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासह सार्वजनिक आरोग्य मालमत्ता कर विषय समितीचे पदसिध्द सभापती पद रिक्त राहिल्यानंतर माजी पाणीपुरवठा व दिवाबत्ती समितीचे सभापती प्रसाद इंगवले यांचा उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे सूचक नगराध्यक्षा सोनल गायकवाड व नगरसेविका अस्मिता पवार यांनी अनुमोदक म्हणून सह्या करून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख व स्विकृत नगरसेवक सुरेश पवार, प्रकाशअण्णा गायकवाड, नगरसेविका स्नेहल मेहता, शिल्पा दरेकर, महिला बालकल्याण सभापती सुनिता पार्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला. या निवडीसाठी हा एकमेव अर्ज दाखल झाल्याने येत्या सोमवारी प्रसाद इंगवले यांची उपनगराध्यक्षपदी निवड फिक्स झाली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.