तालुक्यातील चोळई येथील मरिआईदेवी मंदिराचा जिर्णोध्दार सोहळयानिमित्त सदगुरू आनंददादा मोरेमाऊली यांच्या प्रमुखत्वाखालील स्वागत सोहळयाप्रसंगी रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षिय नेत्यांच्या उपस्थितीने चोळईतील भाविकजन भारावल्याचे दृश्य गुरूवारी पाहण्यास मिळाले.
यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी राजिप अध्यक्ष आस्वाद तथा पप्पूशेठ पाटील, माजी सभापती अस्लम राऊत, माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, माजी पोलादपूर पं.स.सभापती दिलीप भागवत, शेकापक्षाचे तालुकाचिटणीस वैभव चांदे, उबाठा तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, समीर चिपळूणकर, रानवडीचे माजी सरपंच निवृत्ती उतेकर, मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर, सरपंच शरद जाधव, कापडेचे माजी सरपंच अजय सलागरे, देवळेचे माजी सरपंच प्रकाश कदम, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड आदी सर्वपक्षियांची मांदियाळी उपस्थित राहिल्याने खेळीमेळीच्या तसेच भक्तीभावाच्या वातावरणामध्ये मरिआईदेवी मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा दुसऱ्या दिवशी साजरा झाला. याप्रसंगी सदगुरू आनंददादा मोरेमाऊली यांच्याहस्ते श्रीमरीआईदेवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा, उद्योजक संतोष मेढेकर यांच्याहस्ते मंदिराच्या वास्तुचे उदघाटन व ह.भ.प.अजितमहाराज गद्रे यांच्याहस्ते कलशारोहण करण्यात आल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले असता सर्वपक्षियांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई या गावातील मरिआईदेवी मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा बुधवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी पोलादपूर शहरामधून देवीच्या मूर्तीची भव्य दिमाखदार मिरवणूक काढून सुरू झाला.
बुधवारी सकाळी श्रीमरिआई देवीच्या मुर्तीची भव्य मिरवणूक पोलादपूर शहरामध्ये फेटेधारी व टाळकरी महिला व पुरूषांच्या भजनासह शोभायात्रेने काढण्यात आली. याप्रसंगी रायगड जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक एकनाथ गायकवाड, शेकापक्षाचे कळंबे यांच्या उपस्थितीत असंख्य टाळकरी वारकरी व फेटेधारी भाविक मंडळी उपस्थित होती. बुधवारी दुपारी ग्रामस्थ व भाविकांना महाप्रसाद दिल्यानंतर मरिआईदेवीच्या मुर्तीचा जलाधिवास, धान्यधिवास आदी प्राणप्रतिष्ठापना पूर्व धार्मिक विधी करण्यात आले. रात्री श्रीमरीआईदेवी ग्रामस्थ मंडळी चोळई यांच्यातर्फे भजन असे दिवसभराचे उपक्रम राबविण्यात आले.
गुरूवारी मंगळपाठ देवांचे आशीर्वाद घेणे,गणेशपूजन पुण्याहवचन, मातृका तसेच ब्राह्ममंडळ शिखादी वास्तूपिठ देवता, नवग्रहादी मंडळ देवता झाल्यानंतर यानंतर महाप्रसाद व ओंबळीतील ह.भ.प. लक्ष्मणमहाराज जाधव यांचे प्रवचन, श्रीसंत मोरेमाऊली सांप्रदाय हरीपाठ तसेच सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत प.पू.सदगुरूदादा महाराज मोरे माऊली यांची किर्तनसेवा असे कार्यक्रम भरगच्च उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी ग्रामस्थ मंडळ चोळई, मुंबई पुणे मंडळ नवतरूण मित्रमंडळ चोळई यांनी पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांतून आलेल्या भाविकांना महाप्रसादासह श्रीमरीआईदेवीच्या दर्शनाचा लाभ दिला.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.