गुप्त बातमी वरून संशयित वाहनांची तपासणी करत असताना चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या 6 लाखांच्या ट्रकमधून 85 हजारांच्या खैराची अवैध वाहतूक होताना उघडकीस आली असून पोलादपूर वनउपज नाक्यावर एका इसमासह सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यापुर्वीदेखील महाड राजेवाडी फाटा आणि पोलादपूर येथे अनुक्रमे खैराचा अर्क आणि खैराची सोलीव लाकडे यांची वाहतूक पकडण्यात आली असून आताच्या कारवाईमुळे खैरतस्करीचे चिपळूण कनेक्शन पुन्हा चर्चेत आले आहे.
शुक्रवारी दि.21 मार्च रोजी रोहा उप वनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव, सहाय्यक वनसंरक्षक रोहित चौबे, वनक्षेत्रपाल विकास भामरे, महाडचे वनक्षेत्रपाल राकेश साहू, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर वनउपज तपासणी नाका येथे गुप्त बातमी वरून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना पोलादपूर स्टाफ तपासणी स्थानिक परिमंडळ यांना चिपळूणच्या दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक एमएच04जेके 6797) मध्ये 6.805 घनमीटरचे 354 खैर सोलीव तुकडे बिनपासी मुद्देमाल मिळाले.
या मालाची अंदाजे किंमत 85 हजार 205 रूपये असून ट्रकची किंमत 6 लाख रूपये अंदाजे आहे. याप्रकरणी वाहनचालक गुफरान ईरफान अहमद, रा.-ऐनी हातीनसी उत्तर प्रदेश याविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.
हे वाहन जप्त करण्यात आले असून या कारवाईमध्ये स्थानिक स्टाफ पोलादपूर वनपाल परिमंडळ वनाधिकारी बाजीराव पवार, पोलादपूर तपासणी नाका वनरक्षक जयवंत वाघमारे, गोविंद खेडकर, देविदास त्रिभुवन, करंजे वनरक्षक नवनाथ मेटकरी, पोलादपूर वनरक्षक संदिप परदेशी, कोतवाल वनरक्षक अमोल रोकडे, देवळे वनरक्षक भीमराव गायकवाड यांनी सहभाग घेऊन धडक कारवाई यशस्वी केली.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.