Poladpur: आंबेनळी घाटात पिकअप पलटी, गडकिल्ले मोहिमेतील 16 धारकरी जखमी

Accident Ambenali Ghat
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात असलेल्या आंबेनळी घाटाच्या तीव्र वळण उतारावर शनिवारी पहाटे वाजण्याच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील अंकलखोप येथून आलेल्या पिकअप कलंडून अपघात झाला. यामध्ये शिवतेर्थ गडकिल्ले धारातीर्थ मोहिमेतील  16  धारकरी जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यांत अंकलखोप गावात राहणारे गणेश संजय गायकवाड 17 वर्ष, अक्षय वाल्मीक पाटील 25 वर्ष, सत्यम शितल पुजारी 21 वर्ष, ओमकार रविंद्र खामकर 22 वर्षे, यश बाळासाहेब उपाध्ये 23 वर्ष, सागर जकप्पा हल्लोळी 27 वर्षे, पवन कुमार राजेंद्र जाधव 17 वर्षे, योगेश नागेश खामकर 25 वर्षे, अवधूत घनश्याम कुलकर्णी 25 वर्षे, कुणाल बाळासाहेब उपाध्ये 17 वर्षे, पवन दादासाहेब साळुंखे, ओम उदयसिंह कोळी 19 वर्ष, अविष्कार आप्पासाहेब शिंदे 19 वर्षे, संकेत संजय जाधव 24 वर्ष, रोहन सिद्राम तलवार 28 वर्ष, विशंभर वासुदेव जोशी 16 वर्षे सांगली जिल्ह्यातील अंकलखोपचे  16   धारकरी  पिकअप   जीपने श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्रीमान शिवराजधानी रायगड धारातिर्थ गडकोट मोहिमेत सहभागी होण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे निघाले होते.
पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये प्रतापगड बाजूने येताना तीव्र वळण उताराच्या रस्त्यावर कुंभळवणे फाटयालगत त्यांच्या पिकअपने (नंबरप्लेटव एअरटेल स्पीकर लावले आहे) रस्त्याच्या संरक्षक कठडयाला धडक दिली आणि पिकअप रस्त्यालगत कलंडली.
याठिकाणी असलेल्या छोटया टपरीवजा हॉटेलमधील कापडे खुर्दचे उपसरपंच तानाजी जाधव यांना मध्यरात्रीनंतर पिकअपजीपच्या अपघाताचा आवाज ऐकू आला आणि आवाजाच्या दिशेने त्यांनी सहकाऱ्यांसोबत मदतीसाठी धाव घेतली. यावेळी एक धारकरी गंभीर जखमी असल्याने त्यांच्या जखमेतून रस्त्यावर रक्ताची धार वाहात होती तर अन्य धारकऱ्यांना पाठ, डोके, पाय, मांडी व छातीवर दुखापत व किरकोळ जखमा झाल्या होत्या.
यावेळी तातडीने ग्रामस्थांनी वाहनांनी तसेच ऍंम्ब्युलन्सने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले. डॉ. सलागरे व अन्य परिचारिकांनी तातडीने उपचार करून अपघातग्रस्तांना महाड ट्राँमा केअर सेंटर आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. महाड ट्राँमा केअर सेंटरमध्ये रोहयो मंत्री ना. भरत गोगावले यांनी रुग्णांची आस्थापुर्वक चौकशी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading