
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी होली चाईल्ड सीबीएसई शाळेसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. पीएनपी शाळेमध्ये नववी मधील अथर्व दत्ताराय मोरे, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर, महाराष्ट्र येथे आयोजित “सीबीएसई दक्षिण विभाग २ बॉक्सिंग स्पर्धा २०२४-२५” मध्ये कांस्य पदक मिळवले.
९ ते ११ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत मास्टर अथर्व दत्ताराय मोरे याने शाळेसाठी विभागीय स्तरावर पदक मिळवले. या स्पर्धेत संपूर्ण दक्षिण विभागातील राज्यांमधून एकूण ९८ शाळा आणि विविध श्रेणीतील सुमारे ५५० विद्यार्थी सहभागी झाले होते. अथर्वने केरळच्या हेरॉल्डला पराभूत करून स्पर्धेतील ८० किलो वजनी गटात तिसरा क्रमांक पटकावला.
प्रभाकर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील या यशाच्या या प्रवासात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी भक्कम आधारस्तंभ ठरल्या, त्यांच्या मार्गदर्शन व पाठबलामुळेच हे शक्य झाले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल यांनी सांगितले.
या वेळी चित्रलेखा पाटील यांनी सीबीएसई विभागाचे मुख्याध्यापिका वेल्लईम्मल मुरुगन, उपमुख्याध्यापिका सदाफ शाहबाजकर, पी. टी. प्रशिक्षक आदित्य यादव आणि होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.