PEN : रस्त्याचे काम पूर्ण, अपप्रचार फसवा – अभियंता विवेक पाटील

Vivek Patil
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. याच अनुषंगाने खवसावाडी ते तांबडी रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत समाजमाध्यमांवर आरोप होत आहेत. या संदर्भात हर्षा कन्स्ट्रक्शनचे बांधकाम अभियंता विवेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना खोडून काढले.
“खवसावाडी ते तांबडी रस्ता दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेला असून काम अंदाजपत्रकानुसारच करण्यात आले आहे,” असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दोन पावसाळ्यांनंतर रस्त्यावरची माती वाहून गेल्याने काही ठिकाणी खराबी झाली आहे, परंतु वेळोवेळी जेसीबीच्या सहाय्याने डागडुजी केली आहे.
अपप्रचाराचा आरोप
विवेक पाटील यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले की, “फक्त अनिरुद्ध पाटील हे आमदार रविशेठ पाटील यांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. हे निवडणुकीच्या काळात बदनामीसाठी रचलेले षड्यंत्र आहे. आम्ही या प्रकरणी न्यायालयात नुकसानभरपाईचा दावा दाखल करणार आहोत.”
त्यांनी नागरिकांना विनंती केली की, “घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. कामाचा दर्जा आणि अंदाजपत्रकाची खात्री झाल्याशिवाय समाजमाध्यमांवरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये.”
————————————————-
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
जिल्हा परिषदेच्या पेण शाखेचे उपअभियंता प्रकाश गावित यांनीही यास दुजोरा दिला. “खवसावाडी ते तांबडी रस्ता १०० टक्के पूर्ण झाला आहे. मंजूर आराखड्यानुसार सर्व कामे, जसे की कटिंग, खड्डे भराव, नाल्यांना पाइप बसविणे व पिचिंग, ही पूर्ण झाली आहेत. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्याची माती वाहून गेली आहे, परंतु यासाठी आम्ही डांबरीकरणाचा अतिरिक्त निधी मागितला होता, जो मंजूर होऊ शकला नाही,” असे गावित म्हणाले.
————————————————-
सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी
या वादावर विवेक पाटील यांनी कामाचे पुरावे व छायाचित्रे सादर केली आहेत. “आमच्या कामावर संशय घेण्याऐवजी प्रत्यक्ष पाहणी करून खरे-खोटे तपासा,” अशी त्यांची नागरिकांना विनंती आहे.
संतोष ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading