PEN न्यूज’ चा इम्पॅक्ट! उरणमध्ये बेकायदेशीर पार्किंगविरोधी वाहतूक विभागाची विशेष मोहीम, कारवाईला सुरुवात

PEN न्यूज' चा इम्पॅक्ट! उरणमध्ये बेकायदेशीर पार्किंगविरोधी वाहतूक विभागाची विशेष मोहीम, कारवाईला सुरुवात
उरण (विठ्ठल ममताबादे) :
बुधवार दि. 23 एप्रिल २०२५ रोजी PEN न्यूज या वृत्त वाहिनीने उरणमधील बेकायदेशीर पार्किंग बाबत बातमी प्रसिद्ध होताच वाहतूक विभाग अॅक्शन मोडवर येत बेशिस्तपणे पार्किंग करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यास आजपासून सुरुवात केली आहे.
दरम्यान, नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे यांच्या निर्देशाने उरण परिसर व एन एच ४-बी या महामार्गालगत व मुख्य रस्त्यावर पार्क होणाऱ्या अवजड वाहनांवर आळा घालण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.
या मोहिमेच्या दरम्यान सीएफएस व एमटी यार्ड यांच्या बाहेर पार्किंग होणाऱ्या अवजड कंटेनर व मुख्य रस्त्यावर पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहने यावर भारतीय न्याय संहिता २८५ नुसार ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायदा १२२/१७७ नुसार ३६३ कारवाया करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, सतत वाहनांची वर्दळ असलेल्या महामार्गांवर व गोदाम परिसरातील रोडवर कोणत्याही प्रकारे अवजड वाहने पार्किंग होणार नाहीत. वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी आणि सर्व वाहने अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत. महामार्ग अथवा गोदामांच्या रोडवर कोणतेही वाहन उभे केले जात असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी वाहनचालकांना केले आहे. या केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी प्रतींनिधी व PEN न्यूज या वृत्त वाहिनीचे आभार मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading