कोलाड (श्याम लोखंडे ) :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या सुरुवातीला द ग तटकरे चौकातील भला मोठा खड्डा पडला या पडलेल्या खड्ड्यामुळे तीन ते चार टूव्हीलर स्वार पडून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने सर्वजण थोडक्यात बचावले परंतु कोणाचा नाहक बळी गेल्या नंतर हा खड्डा भरला जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात असल्याची बातमी PEN न्यूजमध्ये प्रकाशित झाल्यानंतर याच दिवशी या बातमीची दखल घेत हा खड्डा संबंधितांनकडून भरण्यात आला असुन प्रवाशी तसेच रहिवाशी नागरिक यांनी PEN न्यूजचे आभार मानले.
कोलाड बाजुकडून रोहा बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला काही दिवसापूर्वी या मार्गांवरील प्रचंड मोठया प्रमाणात असणाऱ्या रहदारीमुळे मोठा खड्डा पडला होता यामुळे वाहन चालविताना वाहन चालकांना खबरदारी घ्यावी लागत होती.शिवाय कोलाड बाजारपेठेत चौपदरीकरणाच्या उड्डाण पुलाचे काम सुरु असल्यामुळे महाड कडून मुंबई कडे जाणारी वाहतूक याच बाजूच्या रस्त्यावरून सुरु आहे.