माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरानमध्ये अनेक ठिकाणी जुने गंजलेल्या स्वरूपात विजेचे पोल आहेत, जे वादळी वाऱ्याने केव्हाही उन्मळून पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती याबाबत दि.४ ऑगस्ट रोजी ” विजेच्या जुन्या खांबांमुळे दुर्घटनेची टांगती तलवार ” या आशयाचे वृत्त PEN न्यूज मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.
ई रिक्षा स्टॅन्ड समोर हे जीर्ण विजेचे पोल वादळी वाऱ्याने केव्हाही उमळून पडण्याची दाट शक्यता होती या स्टॅन्ड समोर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते हा मुख्य रहदारीचा रस्ता असून सातत्याने येथे प्रवाशांची, शालेय विद्यार्थी, पादचाऱ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर सुरू असते त्यामुळे हे पोल केव्हाही पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता संतोष पादीर यांना सुचित केले होते. त्यानंतर आता दोन महिन्यानंतर हे पोल काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी, नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडला तसेच PEN न्यूजसह प्रतिंनिधी व प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले.